शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

वडील तुमचे देवच आहेत, कोणत्याही परिस्थितीत त्यांची देखभाल करावी लागेल - उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2024 18:22 IST

उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर सहमती दर्शवली.

झारखंडउच्च न्यायालयाने आपल्या एका निर्णयात मुलाला आपल्या वृद्ध वडिलांच्या देखभालीसाठी कोणत्याही परिस्थितीत पैसे द्यावे लागतील, असे आदेश दिले आहेत. उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर सहमती दर्शवली. न्यायालयाच्या आदेशानुसार मुलाने वडिलांना देखभाल म्हणून दरमहा ३ हजार रूपये द्यायचे होते. या निर्णयाविरोधात मनोज नावाच्या व्यक्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती सुभाष चंद यांनी आपल्या निकालात म्हटले, "दोन्ही पक्षांनी सादर केलेले पुरावे सांगतात की, वडिलांकडे काही शेतजमीन आहे, तरीही ते शेती करण्यात असहाय्य आहेत. ते देखील त्यांच्या मोठ्या मुलावर अवलंबून आहेत, ज्याच्यासोबत ते राहतात. वडिलांनी त्यांचा लहान मुलगा मनोज साव याला संपूर्ण मालमत्तेत समान वाटा दिला आहे. पण, मनोजने त्याच्या वडिलांना १५ वर्षांहून अधिक काळ वडिलांचा सांभाळ केला नाही. वडील काही कमावत असले तरी आपल्या वृद्ध वडिलांना सांभाळणे हे पुत्राचे पवित्र कर्तव्य आहे", असे वृत्त लाइव्ह लॉने दिले. 

उच्च न्यायालयाचा निर्वाळा न्यायमूर्तींनी आदेश देताना महाभारताचा उल्लेख केला. हिंदू धर्मातील पालकांचे महत्त्व अधोरेखित करताना न्यायमूर्ती चंद यांनी आपल्या आदेशात लिहिले की, तुमचे आई-वडील ठीक, बलवान असतील तर तुम्हाला बलवान वाटेल. जर तेच दुःखी असतील तर तुम्हालाही दुःखी वाटेल. वडील तुमचे देव आहेत आणि आई तुमचे रूप आहे. ते बीज असून तुम्ही त्यांची वनस्पती आहे. त्यांच्यामध्ये जे काही चांगले किंवा वाईट आहे, त्याच्यातून तुमच्यात एक वृक्ष तयार होईल. त्यामुळे तुमच्या पालकांचे चांगले आणि वाईट दोन्ही गुण तुम्हाला वारसाने मिळतात. काही लोकांवर त्यांच्या जन्मापासून काही कर्जे असतात, ज्याची आपल्याला कोणत्याही किंमतीत परतफेड करावी लागते.  

याआधी कौटुंबिक न्यायालयाने लहान मुलाला वडिलांच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. याविरोधात लहान मुलाने अपील केली होती. कौटुंबिक न्यायालयात याचिकाकर्त्या वडिलांनी आपल्या लहान मुलाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १२५ अंतर्गत अर्ज दाखल केला होता. वडिलांनी अर्जात दावा केला होता की, त्यांना दोन मुलगे आहेत आणि लहान मुलगा भांडखोर आहे. तो त्यांच्याशी क्रूरपणे वागतो आणि मारहाण देखील करतो.

वडील तुमचे देवच आहेत - न्यायालय दरम्यान, याचिकाकर्त्या वडिलांनी दावा केला होता की, २१ फेब्रुवारी १९९४ रोजी त्यांनी ३९८५ एकर जमीन त्यांच्या दोन मुलांमध्ये समान वाटून दिली होती. या याचिकेत म्हटले आहे की, मोठा मुलगा वडिलांना आर्थिक मदत करतो, तर लहान मुलगा वडिलांकडे दुर्लक्ष करतो आणि अनेकदा मारहाणही करतो. वडिलांनी दावा केला होता की, लहान मुलगा गावातील दुकानातून दरमहा सुमारे ५०,००० रुपये कमावतो, याशिवाय त्याला शेतीतून वार्षिक २ लाख रुपये मिळतात. वृद्ध वडिलांनी आपल्या लहान मुलाला दरमहा १०,००० रुपये देखभाल भत्ता देण्याची विनंती केली होती. त्यावर कौटुंबिक न्यायालयाने मुलाने वडिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चंद यांनी आपल्या निकालात महाभारताचा दाखला दिला. महाभारतात यक्षाने युधिष्ठिरला विचारले, "पृथ्वीपेक्षा जड काय आहे? स्वर्गापेक्षा उंच काय आहे? आणि गवतापेक्षा अगणित काय आहे?" यावर युधिष्ठिराने उत्तर दिले की, माता पृथ्वीपेक्षा जड आहे, पिता स्वर्गापेक्षा उंच आहे, मन हवेपेक्षा अधिक क्षणभंगुर आहे आणि आपले विचार गवतापेक्षा अधिक आहेत. यावर स्पष्टीकरण देत उच्च न्यायालयाने पुत्राला आपले पवित्र कर्तव्य बजावण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :JharkhandझारखंडHigh Courtउच्च न्यायालयMahabharatमहाभारत