शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

महाराष्ट्रात ₹3000, झारखंडमध्ये किती? राहुल गांधींनी महिलांना दिलं मोठं निवडणूक आश्वासन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 19:19 IST

आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.

महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. तेथेही मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष विविध प्रकारच्या आश्वासनांची खैरात वाटताना दिसत आहेत. आज (शनिवार) लोकसभेतील विरोधीपक्षनेते तथा खासदार राहुल गांधी यांनी जमशेदपूरमध्ये एक प्रचारसभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाची आश्वासनं जनतेसमोर ठेवले. तसेच भाजप बरोबरच पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.

राहुल गांधी म्हणाले, ““ही लढाई विचारधारेची आहे. एका बाजूला काँग्रेस पक्ष आणि INDI आघाडी आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि आरएसएस आहे. एका बाजूला प्रेम आणि एकता आहे, तर दुसऱ्या बाजूला द्वेष, हिंसा, क्रोध आणि अहंकार आहे. आम्ही म्हणतो, संविधान वाचवायचे आहे, कारण ते भारताचे आहे, ते जनतेचे रक्षण करते आणि भाजपला संविधान नष्ट करायचे आहे.”

राहुल म्हणाले,  “नरेंद्र मोदी आणि त्यांच्या धोरणांमुळे भारतात सर्वाधिक बेरोजगारी निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपले किती कर्ज माफ केले? पण त्यांनी अदानी-अंबानी सारख्या 25 लोकांचे 16 लाख कोटी रुपये माफ केले. आम्ही ठरवले आहे की, हे जेवढा पैसा माफ करतात, तेवढा पैसा आम्ही जनतेला देऊ.”

‘दर महिन्याला मिळतील 2500 रुपये खटाखट-खटाखट’ -राहुल गांधी म्हणाले, “झारखंडमधील प्रत्येक महिलेला दर महिन्याच्या पहिल्या तारखेला 2500 रुपये मिळतील. खटाखट-खटाखट मिळतील. गॅस सिलिंडर 450 रुपयांना मिळेल, दर महिन्याला 7 किलो रेशन मिळेल. कोणतेही महागडे ऑपरेशन करायचे असो 15 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणार. शेतकऱ्यांना धानासाठी प्रतिक्विंटल 3200 रुपये मिळतील.  गरिबांच्या खात्यात पैसे टाकण्याची आणची इच्छा आहे.

तत्पूर्वी, राहुल गांधी यांनी महाराषट्रात, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 3000 रुपये आणि महिला व मुलींना मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले आहे. याशिवया इतरही काही आश्वासने राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिली आहेत.

टॅग्स :Jharkhandझारखंडcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूक 2024