शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन बेपत्ता?, ईडीची टीम शोधात, BMW कार जप्त, विमानतळावर अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 08:17 IST

ईडीच्या टीमने जेव्हा छापे टाकले, त्यावेळी हेमंत सोरेन घरी नव्हते.

नवी दिल्ली: कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत. सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सकाळी ७ वाजल्यापासून दिल्लीतील शांती निकेतनमधील हेमंत सोरेन यांच्या घरासह ३ ठिकाणी छापे टाकण्यास सुरुवात केली, जी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

ईडीच्या टीमने जेव्हा छापे टाकले, त्यावेळी हेमंत सोरेन घरी नव्हते. त्यानंतर ईडीने निघताना त्यांची बीएमडब्ल्यू कारही जप्त केली. ईडीने जप्त केलेली कार एचआर (हरियाणा) क्रमांकाची आहे. त्यामुळे हेमंत सोरेन बेपत्ता झाल्याची चर्चा रंगली आहे. खबरदारी घेत ईडीच्या टीमने हेमंत सोरेन यांच्याबाबत विमानतळावर अलर्टही पाठवला आहे. सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना रांचीमध्ये एका ठिकाणी जमण्यास सांगण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. 

दरम्यान, भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे. दुबे यांनी म्हटले आहे की, हेमंत सोरेन यांनी जेएमएम आणि काँग्रेस तसेच सहयोगी आमदारांना रांचीला बोलावले आहे. ते पुढे म्हणाले की, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव आला आहे. 

दोन दिवसांपूर्वी सोरेन दिल्लीला रवाना 

हेमंत सोरेन हे शनिवारी (२७ जानेवारी) रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. त्यांनी चार्टर फ्लाइटने उड्डाण केले होते. त्यानंतर काही राजकीय बैठका घेण्यासाठी ते दिल्लीला गेल्याचे सांगण्यात आले. तेथे ते कायदेशीर सल्लाही घेणार आहे. यापूर्वी, ईडीने त्यांना १०वे समन्स पाठवले होते आणि २९ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान हजर राहण्यास सांगितले होते. 

नेमकं प्रकरण काय?

झारखंडमधील माफियांकडून जमिनीच्या मालकीच्या बेकायदेशीर बदलाचे मोठे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप आहे. ईडी या प्रकरणाचा तपास करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत १४ जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये २०११च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी छवी रंजन यांचाही समावेश आहे, ज्यांनी यापूर्वी राज्याच्या समाजकल्याण विभागाचे संचालक आणि रांचीचे उपायुक्त म्हणून काम केले होते. ४८ वर्षीय झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) नेत्याची ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामाशी संबंधित आणखी एका मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशी केली होती.

टॅग्स :JharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय