शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड सीएम सोरेन ३१ तासांनी रांचीत समोर आले, ईडी काही दिवसापासून शोध घेत होती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 15:56 IST

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सोमवारपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली होती.

Hemant Soren ( Marathi News) : ईडीच्या तपासामुळे झारखंडमध्ये राजकीय पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन ईडीच्या चौकशीला टाळताना दिसत आहेत. सोमवारी ईडीचे पथक दिल्लीत दिवसभर त्यांचा शोध घेत होते, मात्र सोरेनचा यांचा शोध लागला नाही. मुख्यमंत्री सोरेन आता अतिशय नाट्यमय पद्धतीने रांचीला पोहोचले आहेत. ते आमदारांची बैठक घेत आहेत. या बैठकीत त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कल्पना सोरेनही उपस्थित आहेत. त्यांच्या जागी ते पत्नीला राज्याचे मुख्यमंत्री करू शकतात, अशी चर्चा आहे.

सोमवारी ईडीचे पथक दिल्लीतील त्यांच्या घरी पोहोचले, मात्र ते बेपत्ता असल्याचे आढळून आले. यानंतर ईडीने त्यांच्या घरातून २ बीएमडब्ल्यू कार आणि काही रोकड जप्त केली. ईडीची टीम वाट पाहत राहिली पण सीएम सोरेन यांचा काहीही पत्ता लागला नाही. तर त्यांचे चार्टर्ड विमान दिल्ली विमानतळावरच उभे होते.

मोठी बातमी: हेमंत सोरेन अचानक दिल्लीला रवाना; ईडीची टीमही निवासस्थानी दाखल, अटक होणार?

दुसरीकडे, भाजपने सीएम सोरेन यांना बेपत्ता मुख्यमंत्री म्हणून संबोधले असून झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीही केली आहे. हेमंत सोरेन यांना त्यांच्या पत्नीला मुख्यमंत्री बनवायचे आहे, असे भाजप नेते निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

२७ जानेवारीला मुख्यमंत्री सोरेन रांचीहून दिल्लीला पोहोचले होते. जमीन घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी ईडीने त्यांना २९ ते ३१ जानेवारी दरम्यान चौकशी करण्यासाठी वेळ मागितला होता. सीएम सोरेन यांची चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक २९ जानेवारीला त्यांच्या दिल्लीतील शांती निकेतन या निवासस्थानी पोहोचले. चौकशीदरम्यान ते घरात उपस्थित नव्हते. ईडीच्या टीमने सीएम सोरेन यांची १३ तासांपेक्षा जास्त वेळ वाट पाहिली. ईडीच्या टीमने सीएम सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची झडती घेतली. यावेळी बीएमडब्ल्यू कार, ३६ लाख रुपये रोख आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. सोरेन यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी ईडीची टीमही विमानतळावर हजर होती. यासोबतच टीम झारखंड भवन आणि इतर काही ठिकाणीही गेली, पण मुख्यमंत्री सोरेन यांचा पत्ता लागला नाही.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयJharkhandझारखंड