शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Jharkhand Assembly Elections 2019: भाजपाकडून जाहीरनामा प्रसिद्ध; जनतेला दिली 'ही' आश्वासनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 16:22 IST

झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.

रांचीः झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपानं जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्याला भाजपानं संकल्पपत्र असं नाव दिलं आहे. मुख्यमंत्री रघुवर दास, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद आणि अर्जुन मुंडा यांच्या उपस्थितीत भाजपानं संकल्पपत्र जारी केलं आहे. या संकल्पपत्रात मुलींना केजी ते पीजीपर्यंत मोफत शिक्षण देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. तसेच महिलांना नोकरीमध्ये 33 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. 2022पर्यंत प्रत्येक गरिबाला सरकार घर देणार आहे. शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देणार आहे.  2022पर्यंत 70 नवी एकलव्य विद्यालयं उघडण्यात येणार असून, विद्यालयांची संख्या दुप्पट होणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन मेगा कौशल्य केंद्र उघडली जाणार असून, आयटीआय उघडण्याचं आश्वासन दिलं आहे. कृषी उद्योगाच्या विकासाला चालना देण्यात येणार आहे. ज्ञान आणि कौशल्यावर आधारित कृषी क्षेत्राचा विस्तार होणार आहे. झारखंडमध्येही दुग्ध उत्पादनालाही चालना देण्यात येणार आहे. तसेच राज्यात स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीची स्थापना करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय पदक विजेत्यांना पेन्शन योजना लागू करण्यात येणार आहे. तसेच एँटी ट्रॅफिकिंग पोलीस युनिटचीही स्थापना होणार असून, 2024पर्यंत 22 हजार किमीचे नवे मार्ग बनवण्याचा भाजपाचा संकल्प आहे. 'हो' भाषा समृद्ध करण्यासाठी योजना तयार करण्यात येणार आहे. संकल्प पत्र जारी केल्यानंतर सीएम रघुवर दास झारखंडला नव्या उंचीवर नेण्यासाठी भाजपा प्रयत्नशील राहणार असल्याचं म्हटलं आहे. राज्यात मजबूत सरकार देणं गरजेचं आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वांचा विकास झाला आहे. यापुढेही विकास होत राहील, राज्यातील सरकारवर एकही भ्रष्टाचारा आरोप नाही, असंही रघुवर दास म्हणाले आहेत.   

टॅग्स :BJPभाजपाjharkhand election 2019झारखंड निवडणूक 2019