शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
लग्नाच्या सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
3
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
4
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
5
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
6
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
7
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
8
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
10
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
11
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
12
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
13
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
14
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
15
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
16
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
17
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
18
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
19
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
20
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत

झारखंडमध्ये समान नागरी संहिता लागू करू, आदिवासींना वगळणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 06:38 IST

Jharkhand Assembly Election 2024: झारखंडमध्ये सत्तेत आल्यास राज्यामध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात येईल, मात्र त्यातून आदिवासींना बाहेर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. झारखंड विधानसभेसाठी त्यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

- एस. पी. सिन्हा रांची - झारखंडमध्ये सत्तेत आल्यास राज्यामध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात येईल, मात्र त्यातून आदिवासींना बाहेर ठेवण्यात येईल, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिले. झारखंड विधानसभेसाठी त्यांनी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. याशिवाय ‘सरना धर्म संहिता’बाबत चर्चा करुन याेग्य निर्णय घेऊ, असे अमित शाह यांनी यावेळी सांगितले.

शाह म्हणाले, भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०च्या जयंतीचा विचार करुन भाजपने १५० संकल्प केले आहेत. त्यात आदिवासी, महिला, तरुण आणि ज्येष्ठांसह समजातील सर्व घटकांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. पेपरफुटीचा सीबीआय आणि एसआयटीमार्फत तपास करून दाेषींना शिक्षा देऊ. भाजप सत्तेवर आल्यास ५१ वन्यउत्पादने हमीभावाने तसेच ३,१०० रुपये प्रति क्विंटल दराने धान खरेदी करेल, असे शाह म्हणाले. 

हा जाहीरनामा आदिवासी समाजाचा विकास, राेजगार देणे तसेच महिलांना सशक्त करणारा आहे. आमचा पक्ष ‘राेटी, बेटी व माटी’च्या रक्षणासाठी प्रतिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र माेदी म्हणाले.

प्रमुख आश्वासने- २.८७ लाख सरकारी नाेकऱ्या- ५ लाख राेजगाराच्या संधी- २,१०० रुपये गाेगाे दिदी याेजनेंतर्गत महिलांना दरमहा देणार- २१ लाख कुटुंबांना पक्के घर देणार- दाेन-तीन वर्षांत राज्यातून नक्षलवाद आणि मानव तस्करीची समस्या साेडविणार.

टॅग्स :JharkhandझारखंडBJPभाजपाAmit Shahअमित शाह