उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एक हायव्होल्टेज ड्रामा समोर आला आहे. एका महिला अचानक तिच्या मुलाला घेऊन तिच्या बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली. महिलेचा दावा आहे की, तरुणाने आधी तिच्यावर प्रेम केलं, लग्न करून आपल्यासोबत ठेवलं आणि आता दुसरीशी लग्न केलं. तर दुसरीकडे तरुणाच्या पत्नीने महिलेवर बदनामी केल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरण खोटं असल्याचं म्हटलं आहे. "माझा नवरा असा आहेच नाही. हीच जबरदस्तीने त्याच्या गळ्यात पडत आहे" असं सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, झाशीतील टोडीफतेहपूर परिसरातील रेवन गावात ही घटना घडली आहे. एक महिला तिच्या मुलाला घेऊन एका बॉयफ्रेंडच्या घरी पोहोचली आणि गेल्या तीन दिवसांपासून घराबाहेर बसली आहे. महिलेचं म्हणणं आहे की. येथे राहणाऱ्या तरुणाशी तिचे प्रेमसंबंध होते. २०२२ मध्ये तिचं मध्य प्रदेशातील छतरपूर येथे लग्न झालं. त्यानंतरही प्रेमप्रकरण सुरूच होतं. लग्नानंतर काही महिने ती या तरुणासोबत गुरसराय येथे राहू लागली, जिथे तिने एका मुलाला जन्म दिला.
महिलेने सांगितलं की, १५ जुलै रोजी तिचा बॉयफ्रेंड रेवन गावी जात असल्याचं सांगून निघून गेला, त्यानंतर तो परतला नाही. जेव्हा ती रेवनला पोहोचली तेव्हा तिला कळालं की तिचा बॉयफ्रेंडच्या घरातूही बेपत्ता आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं. दुसरीकडे, तरुणाच्या पत्नीने तिच्या पतीवर विश्वास ठेवून सांगितलं की तिचा नवरा असा नाही. त्याचे कोणाशीही प्रेमसंबंध नाहीत. ही महिला आता अचानक घरी आली.
गर्लफ्रेंडने आमचं छतरपूरमध्ये लग्न झाल्याचं सांगितलं. त्यानंतर आम्ही गुरसरायमध्ये राहिलो. मी माझ्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने मला धमकावलं. तो गायब झाला म्हणून मी येथे आले आहे. मला माहित नाही की हे लोक त्याला कुठे घेऊन गेले आहेत. मी तीन दिवसांपासून येथे बसले आहे. पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याचं दुसरं लग्न कधी झालं हे मला माहित नाही असं गर्लफ्रेंडने म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.