शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 15:56 IST

एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली. 

झाशीच्या महाराणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजच्या नवजात शिशु वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत आतापर्यंत १० निष्पाप मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने देशभरातील लोकांचं मन हेलावलं. घटनेच्या दिवशी एनआयसीयू वॉर्डमध्ये कर्तव्यावर तैनात असलेल्या नर्स मेघा यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता १५ मुलांची आगीतून सुखरुप सुटका केली. 

मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या मेघा यांच्या कपड्यांना आग लागली मात्र त्यांच्या ते लक्षात आले नाही. इतर कर्मचाऱ्यांनी अलार्म लावून कपडे जळल्याची माहिती दिली असता मेघा यांनी कपडे काढले. त्यानंतरही त्या मुलांना वाचवण्यात व्यस्त राहिल्या. मेघा यांचं आता देशभरात कौतुक होत आहे. लोक त्यांना झाशीची राणी असंही म्हणत आहेत.

मेघा यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, ही घटना इतक्या अचानक घडेल असा सर्वांनी कधीच विचार केला नव्हता. त्या रोजच्या प्रमाणेच काम करत होत्या. वॉर्डमध्ये अचानक शॉर्टसर्किट झालं, जे विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. शॉर्टसर्किटला कारणीभूत असलेली वायरही काढून फेकण्यात आली मात्र तोपर्यंत आग सर्वत्र पसरली होती. फायर एक्स्टेंशनद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र ती विझवता आली नाही आणि आग वाढतच गेली.

जीव धोक्यात घालून मुलांना वाचवलं

मुलांच्या लाईव्ह सपोर्टसाठी संपूर्ण वॉर्डात ऑक्सिजन आहे, त्यामुळे आग अधिक वेगाने पसरली. आग विझली जात नव्हती. त्यामुळे आम्ही घाईघाईने आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या आणि पालकांच्या मदतीने मुलांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. आम्ही सतत प्रयत्न करत असताना माझ्या पायजम्यालाही आग लागली. मी मुलांना वाचवण्यात एवढी व्यस्त होते की माझ्या पायजम्याला आग लागली आहे हे माझ्या लक्षातही आलं नाही.

तुझा पायजमा जळाला असं इतरांनी सांगितल्यावर मी जाऊन पायजमा काढला. तोपर्यंत माझा पाय खूप भाजला होता. पण माझ्या पायाची पर्वा न करता मी त्या १५ मुलांना सुखरूप बाहेर हलवलं. आगीच्या ज्वाळांमुळे व्हेंटिलेटरवर दाखल असलेल्या मुलांपर्यंत पोहोचणं कठीण झालं होतं. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने संपूर्ण वॉर्डमध्ये धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे आम्ही त्या मुलांना वाचवू शकलो नाही असं मेघा यांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :hospitalहॉस्पिटलfireआग