शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 11:50 IST

आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत.

उत्तर प्रदेशातील झाशी येथील मेडिकल कॉलेजच्या चाईल्ड वॉर्डमध्ये शुक्रवारी रात्री लागलेल्या आगीत १० मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या कालावधीत १६ मुलं गंभीर जखमी झाली. आधी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात होतं मात्र आता वेगळीच माहिती समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की, एका नर्सने ऑक्सिजन सिलिंडरच्या पाईपला जोडण्यासाठी माचिसची काडी पेटवली आणि आग लागली. यानंतर संपूर्ण वॉर्डने पेट घेतला.

झाशीच्या मुख्य वैद्यकीय अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, एनआयसीयू वॉर्डमध्ये ५४ मुलांना दाखल करण्यात आलं होतं, अचानक ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटरला आग लागली ज्यामुळे ऑक्सिजनने भरलेल्या एनआयसीयू वॉर्डमध्ये आग पसरली. झाशी विभागाचे डीआयजी म्हणाले की, आग पूर्णपणे आटोक्यात आली असून जखमींना हलवण्याचं काम सुरू आहे. सीएम योगी यांनी या घटनेची दखल घेत १२ तासांत अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हमीरपूरचे रहिवासी भगवान दास यांच्या मुलाला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल आग लागली तेव्हा भगवान दास वॉर्डमध्ये उपस्थित होते. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट हे कारण सांगितलं जात असलं तरी भगवान दास हा या घटनेचे एकमेव प्रत्यक्षदर्शी असून यामागचं खरं कारण सांगत आहे.

भगवान दास यांच्या म्हणण्यानुसार, मुलांच्या वॉर्डमध्ये ऑक्सिजन सिलेंडरच्या पाईपला जोडण्यासाठी नर्सने माचिसची काडी पेटवली. त्यानंतर आग लागली आणि संपूर्ण वॉर्ड पेटला. आग लागल्याचं लक्षात येताच भगवान दास यांनी त्यांच्या गळ्यात असलेला कपडा घेतला आणि ३ ते ४ मुलांना वाचवलं, इतर लोकांच्या मदतीने आणखी काही मुलंही वाचली.

धक्कादायक बाब म्हणजे आग लागल्यानंतर ना फायर अलार्म वाजला, ना वॉर्डात ठेवलेल्या सिलिंडरचा काही उपयोग झाला. सिलिंडर फिलिंग डेट २०१९ आहे आणि एक्सपायरी डेट २०२० आहे. म्हणजे अग्निशमन यंत्राची मुदत संपून अनेक वर्षे लोटली होती आणि हे सिलिंडर नुसते दाखवण्यासाठी येथे ठेवण्यात आले होते.

"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो

१० चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. तर ३७ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. आगीमुळे रुग्णालयात चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत अनेक कुटुंबांनी आपली मुलं गमावली. आज तकशी बोलताना एका लहान मुलाचे वडील कुलदीप यांनी टाहो फोडला. त्यांनी सांगितलं की, माझा मुलगा ७-८ तासांपासून बेपत्ता होता. मदतीच्या नावाखाली आजपर्यंत एकही अधिकारी भेटायला आलेला नाही. ही दुर्घटना घडली त्यावेळी वॉर्डमध्ये जवळपास ५० मुलं होती. आग लागल्यावर ज्यांची मुलं होती ते थेट आत घुसले आणि त्यांनीच आपल्या मुलांना वाचवलं. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशhospitalहॉस्पिटलfireआग