जेट ट्रेनर विमान उड्डाणांवर बंदी नाही
By Admin | Updated: December 10, 2014 02:31 IST2014-12-10T02:31:03+5:302014-12-10T02:31:03+5:30
विमानांच्या उड्डाणांवर कोणत्याही प्रकारची बंदी आणली नसल्याचे संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी मंगळवारी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

जेट ट्रेनर विमान उड्डाणांवर बंदी नाही
विजय दर्डा यांच्या प्रश्नाला र्पीकर यांचे राज्यसभेत उत्तर
नवी दिल्ली : हवाईदलाने जेट प्रशिक्षणार्थी (ट्रेनर) विमानांच्या उड्डाणांवर कोणत्याही प्रकारची बंदी आणली नसल्याचे संरक्षण मंत्री मनोहर र्पीकर यांनी मंगळवारी राज्यसभेत खा. विजय दर्डा यांच्या प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.
हवाईदलाकडून जेट ट्रेनर विमानासह सर्व लढाऊ विमानांची वेळोवेळी समीक्षा केली जात असून, त्यासंबंधी अहवालाच्या आधारावर योग्य पावले उचलली जातात, असे त्यांनी लेखी उत्तरात नमूद केले. सदोष डिझाईनमुळे या विमानांची उड्डाणो रोखण्यात आली काय, असा प्रश्न खा. दर्डा यांनी उपस्थित केला होता. या विमानांचे डिझाईन पुन्हा तयार करण्यासाठी जास्त काळ आणि पैसा लागणार काय? किंवा हवाईदलाने त्याबाबत कोणती पर्यायी व्यवस्था केली आहे काय?, असे प्रश्नही त्यांनी विचारले होते. माहिती आणि प्रसारण मंत्रलयाकडून एखादी वृत्तसंस्था सुरू करण्याची एखादी योजना आहे काय?, या खा. दर्डा यांच्या अन्य प्रश्नाला उत्तर देताना माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी तशी कोणतीही योजना नसल्याचे स्पष्ट केले.