उड्डाणादरम्यान दुस-या विमानाला धडकलं जेट एअरवेजचं विमान
By Admin | Updated: May 7, 2017 22:20 IST2017-05-07T22:20:13+5:302017-05-07T22:20:13+5:30
दिल्ली विमानतळावर आज मोठा अपघात होता होता टळला आहे.
_ns.jpg)
उड्डाणादरम्यान दुस-या विमानाला धडकलं जेट एअरवेजचं विमान
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - दिल्ली विमानतळावर आज मोठा अपघात होता होता टळला आहे. जेट एअरवेजचे एक विमान दिल्लीहून श्रीनगरला जाण्यासाठी उड्डाण घेत असतानाच रनवेवर बाजूनं येणा-या विमानाला या विमानाचा पंखा धडकला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. तसेच विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती जेट एअरवेजनं दिली आहे.
गेल्या 48 तासांत देशातल्या विमानतळावर असा प्रकार दुस-यांदा घडला आहे. कालच जयपूर एअरपोर्टवर इंडिगोचे विमान लँडिंग करत असताना विमानतळावरील एका पुलाला धडकले होते. वैमानिक विमान पार्क करत असताना हा प्रकार घडला होता. मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना घडली नाही. या विमानात 178 प्रवासी होते. गेल्या काही दिवसांपासून विमानतळांवरील अशा दुर्घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. महिन्याभरापूर्वी दिल्ली विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगोची विमाने समोरासमोर आली असता एटीसीच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली होती.