ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जीवन गौरव पुरस्कार
By Admin | Updated: December 6, 2014 21:24 IST2014-12-06T21:24:51+5:302014-12-06T21:24:51+5:30
सुप्रसिध्द, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणारा 'जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे.

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जीवन गौरव पुरस्कार
ऑनलाइन लोकमत
दुबई , दि. ६ - सुप्रसिध्द, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणारा 'जीवन गौरव पुरस्कार' जाहीर झाला आहे. हा चित्रपट महोत्सव १० ते १७ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.
आशा भोसले यांनी १२ हजारांहून अधिक गाणी गात विश्वविक्रम केला आहे. आशाजींनी सिनेसृष्टीत दिलेल्या भरीव योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले असून पुरस्कार मिळाल्याबद्दल आशा भोसले यांनी आनंद व्यक्त केला असून त्या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत.