शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

वर्षातून दोनदा होणार जेईई, नीट, नेट आणि सीटेटच्या परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 01:31 IST

नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) डिसेंबर २०१८मध्ये पहिली परीक्षा घेतली जाणार आहे. याची स्थापना केंद्र सरकारच्या वतीने जेईई मेन्स, नीट, नेट आणि सीटेट परीक्षांसाठी करण्यात आली आहे.

एस. के. गुप्ता  नवी दिल्ली : नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने (एनटीए) डिसेंबर २०१८मध्ये पहिली परीक्षा घेतली जाणार आहे. याची स्थापना केंद्र सरकारच्या वतीने जेईई मेन्स, नीट, नेट आणि सीटेट परीक्षांसाठी करण्यात आली आहे. यामुळे सीबीएसईवरील बोर्ड परीक्षांशिवाय अन्य परीक्षांचा ताण कमी होणार आहे. तसेच उच्चशिक्षण संस्था आणि शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांत पात्रता मापदंडाची परीक्षा आयोजित करण्यासाठी एक वेगळी एजन्सी मिळणार आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, एनटीएच्या माध्यमातून केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयात शिक्षक भरती परीक्षांचे आयोजनही होईल. यापूर्वी मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून सांगण्यात येत होते की, एनटीए २०१९मध्ये पहिल्या परीक्षेचे आयोजन करील. एनटीएचे महासंचालक म्हणून नियुक्त करण्यात आलेले आयएएस विनीत जोशी यांनी पदभार स्वीकारताच मंत्रालय याबाबत गतीने काम करण्यासाठी सक्रिय झाले आहे. विनीत जोशी हे यापूर्वी केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचे (सीबीएसई) अध्यक्ष राहिलेले आहेत. बोर्डातून ते प्रतिनियुक्तीवर मणिपूरला गेले होते. सीबीएसईमधील बोर्ड परीक्षांच्या प्रश्नपत्रिका लीक प्रकरणानंतर बोर्डाकडून आयोजित करण्यात येणाºया अन्य परीक्षांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. अशावेळी सरकारचा असा प्रयत्न आहे की, लवकरात लवकर एनटीएच्या माध्यमातून परीक्षांचे आयोजन केले जावे. यामुळे बोर्डाचे काम केवळ शाळांना संलग्नता देणे, बोर्डाची परीक्षा घेणे आणि निकाल जाहीर करण्यांपर्यंतच मर्यादित राहणार आहे. तसेच, यामुळे परीक्षांची गुणवत्ताही सुधारणार आहे.विद्यार्थ्यांना दोनदा संधीमनुष्यबळ विकास मंत्रालयाचे सचिव (उच्च शिक्षण) आर. सुब्रह्मण्यम यांनी सांगितले की, एनटीएच्या स्थापनेने अनेक फायदे होणार आहेत. सध्या इंजिनीअरिंग आणि मेडिकल शिक्षण संस्थात प्रवेशासाठी वर्षातून एकदा प्रवेश परीक्षा होते. एनटीए २०१९पासून वर्षातून दोनदा या परीक्षांचे आयोजन करणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना वर्षातून दोन संधी मिळणार आहेत. याशिवाय शाळेतील शिक्षक भरतीसाठी अनिवार्य पात्रता चाचणी सीटेट आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी नेट परीक्षेचे आयोजनही वर्षातून दोनदा होणार आहे. केंद्र सरकारकडून एनटीएच्या स्थापनेसाठी २५ कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.