JEE Main April Session Postponed: जेईई मेनची परीक्षा लांबणीवर; लवकरच नव्या तारखांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 12:20 PM2021-04-18T12:20:19+5:302021-04-18T12:21:24+5:30

JEE Main April Session Postponed: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली माहिती

jee main april 2021 jee main exam postponed amid rising cases of corona exams scheduled to be held on 27 28 and 30 | JEE Main April Session Postponed: जेईई मेनची परीक्षा लांबणीवर; लवकरच नव्या तारखांची घोषणा

JEE Main April Session Postponed: जेईई मेनची परीक्षा लांबणीवर; लवकरच नव्या तारखांची घोषणा

googlenewsNext

नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जेईई मेन परीक्षा स्थगिती करण्यात आली आहे. एप्रिलमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करून दिली. कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती पाहता जेईई मेन २०२१ (एप्रिल) परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. (JEE Main April Session Postponed)

जेईई मेन २०२१ परीक्षेचं आयोजन २७, २८ आणि ३० एप्रिलला करण्यात आलं होतं. दोन टप्प्यांमध्ये परिक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र आता ही परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुढील परीक्षांच्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील आणि परीक्षांच्या तारखांच्या १५ दिवस आधी त्याची माहिती दिली जाईल, असं निशंक यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.




नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई मेन परीक्षा चार सत्रात आयोजित करत आहे. यापैकी दोन सत्र पूर्ण करण्यात आले आहेत. पहिलं सत्र २३-२६ फेब्रुवारी २०२१ दरम्यान आयोजित करण्यात आलं होतं. तर दुसऱ्या सत्राचं आयोजन १६-१८ मार्च दरम्यान आयोजित केलं गेलं होतं. पहिल्या सत्रात ६ लाख २० हजार ९७८, तर दुसऱ्या सत्रात ५ लाख ५६ हजार २४८ उमेदवारांनी परीक्षा दिली होती.

Web Title: jee main april 2021 jee main exam postponed amid rising cases of corona exams scheduled to be held on 27 28 and 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.