साक्षी महाराजांसमोर मुलीला काढायला लावली जीन्स

By Admin | Updated: May 6, 2016 08:15 IST2016-05-06T08:15:47+5:302016-05-06T08:15:47+5:30

साक्षी महाराजांसमोर तरुण मुलीला जीन्स काढायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे ज्यानंतर साक्षी महाराजांवर टीकेची झोड उठली आहे

Jeans dressed in front of Sakshi Maharaj | साक्षी महाराजांसमोर मुलीला काढायला लावली जीन्स

साक्षी महाराजांसमोर मुलीला काढायला लावली जीन्स

>ऑनलाइन लोकमत - 
लखनऊ, दि. 06 - भाजपा खासदार साक्षी महाराज पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. साक्षी महाराजांसमोर तरुण मुलीला जीन्स काढायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. ज्यानंतर साक्षी महाराजांवर टीकेची झोड उठली आहे. भाजपा कार्यकर्ता मेदान सिंग यांच्या घरी गेले असताना धक्कादायक हा प्रकार घडला आहे. 
 
भाजपा कार्यकर्ता मेदान सिंग यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला होता. बेकायदेशीररित्या दारुविक्री सुरु असल्याच्या संशयावरुन पोलिसांनी हा छापा टाकला होता. या छाप्यात मेदान सिंग यांच्या कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले होते. ज्यांची भेट घेण्यासाठी साक्षी महाराज गेले होते. यावेळी साक्षी महाराजांना जखमा दाखवण्यासाठी मुलीला जीन्स काढायला लावण्यात आली. धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा हा प्रकार चालू होता तेव्हा लोक खुप मोठ्या संख्येने उपस्थित होते तसंच कॅमेरेदेखील चालू होते. 
 
पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी 
हा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाल्यानंतर ही घटना अयोग्य असल्याची टीका सुरु झाली. एकीकडे हा वाद सुरु असताना साक्षी महाराज यांनी मेदान सिंग यांच्या घरी घुसणा-या पोलिसांना गोळ्या घालण्याची धमकी दिल्याने नवा वाद निर्माण झाला असल्याची माहिती मिळाली आहे. साक्षी महाराज यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 

Web Title: Jeans dressed in front of Sakshi Maharaj