्नराज्यातही कापूस उत्पादकांना बोनस द्या जीन प्रेस असोसिएशन : गुजरातेत बोनस दिल्याचा फटका खान्देशला बसणार

By Admin | Updated: December 16, 2015 23:49 IST2015-12-16T23:49:16+5:302015-12-16T23:49:16+5:30

जळगाव- गुजरात सरकारने कापूस महामंडळास (सीसीआय) कापूस विक्री केलेल्या शेतकर्‍यांना क्विंटलमागे ६५० रुपये बोनस जाहीर केला आहे. यामुळे आता खान्देश किंवा राज्यातील तसेच मध्य प्रदेशातील कापूस मोठ्या प्रमाणात गुजरातेत जाईल. याचा फटका जिनींग व्यावसायिकांना तर बसेलच याशिवाय व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होईल, असे खान्देश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रदीप जैन यांनी म्हटले आहे.

Jean Press Association: Guidelines for giving bonus to Gujarat will keep Khandesh fit. | ्नराज्यातही कापूस उत्पादकांना बोनस द्या जीन प्रेस असोसिएशन : गुजरातेत बोनस दिल्याचा फटका खान्देशला बसणार

्नराज्यातही कापूस उत्पादकांना बोनस द्या जीन प्रेस असोसिएशन : गुजरातेत बोनस दिल्याचा फटका खान्देशला बसणार

गाव- गुजरात सरकारने कापूस महामंडळास (सीसीआय) कापूस विक्री केलेल्या शेतकर्‍यांना क्विंटलमागे ६५० रुपये बोनस जाहीर केला आहे. यामुळे आता खान्देश किंवा राज्यातील तसेच मध्य प्रदेशातील कापूस मोठ्या प्रमाणात गुजरातेत जाईल. याचा फटका जिनींग व्यावसायिकांना तर बसेलच याशिवाय व्यापार्‍यांचे मोठे नुकसान होईल, असे खान्देश जीन प्रेस कारखानदार असोसिएशनचे माजी अध्यक्ष प्रदीप जैन यांनी म्हटले आहे.
गुजरातेत ३० लाख गाठींची निर्मिती झाली आहे. पैकी फक्त साडेतीन हजार गाठींची निर्मिती सीसीआयने केली आहे. याचा अर्थ असा की कमाल शेतकर्‍यांना बोनसचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्या खाजगी व्यापार्‍यांनी तेथे कापूस खरेदी केला, त्यापासून रूई तयार केली त्यांच्याशी जुळलेल्या शेतकर्‍यांना बोनसपासून वंचित राहावे लागेल, असे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाचे सदस्य अरविंद जैन, जीन प्रेस असोसिएशनचे कार्याध्यक्ष अनिल सोमाणी, सदस्य दीपक पोलडिया, जीवन बयस यांनी म्हटले आहे.
राज्यात सरसकट बोनस द्या
गुजरात सरकारने फक्त सीसीआयकडे कापूस विक्री करणार्‍या शेतकर्‍यांना बोनस देण्याचे म्हटले आहे. राज्यातही कापूस उत्पादकांना बोनस द्यावा. पण हा बोनस खाजगी व्यापारी, जिनींग व सीसीआय यांच्याकडे कापूस विक्री करणार्‍या शेतकर्‍यांनाही द्यावा, अशी मागणीही प्रदीप जैन व इतर सदस्यांनी केली आहे.
गुजरातेत बोनस जाहीर झाल्याने तेथे कापसाला राज्याच्या तुलनेत अधिक भाव मिळेल. अर्थातच राज्यात कापसाची खरेदी करून अनेक व्यापारी गुजरातेत कापूस नेतील. यामुळे राज्यातील जिनींग उद्योगाला फटका बसेल, असेही असोसिएशनने म्हटले आहे.

Web Title: Jean Press Association: Guidelines for giving bonus to Gujarat will keep Khandesh fit.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.