शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतीयांवरील हल्ल्यांमागे काँग्रेस आमदार अल्पेश ठाकोर, भाजपा-जेडीयूचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 14:16 IST

गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. 

अहमदाबाद - गुजरातमध्ये उत्तर भारतीयांविरोधात सुरू झालेल्या आंदोलनाने हिंसक रूप घेतले असून, स्थानिकांकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे हजारो उत्तर भारतीयांनी पलायन केले आहे. आता गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांवरून राजकारणालाही तोंड फुटले असून, या हल्ल्यांसाठी काँग्रेसला जबाबदार धरत जेडीयूने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. तर काँग्रेसने या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे उत्तर मागितले आहे. बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या जनता दल युनायटेडने गुजरातमध्ये उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना खुले पत्र लिहिले असून, या हल्ल्ल्यांसाठी काँग्रेसचे आमदार अल्पेश ठाकोर हे जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. काँग्रेसच्या मनात बिहारील नागरिकांविषयी एवढा द्वेष का आहे, असा सवाल जेडीयूने या पत्रामधून केला आहे. भाजपानेही या हिंसाचारासाठी काँग्रेसला जबाबदार धरले आहे.  काँग्रेस एका रणनीतीनुसार ठरवून हिंसाचार घडवत असून, काँग्रेसचे नेते देशाचे विभाजन करण्याच्या कार्यात गुंतले आहेत. गुजरातमधील हिंसाचार हा अल्पेश ठाकोर यांची सेना करत आहे, असा आरोप भाजपा नेते गिरिराज सिंह यांनी केला आहे. मात्र ठाकोर यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.  मात्र या हिंसाचाराप्रकरणी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच सवाल केला आहे. गुजरातमध्ये होत असलेल्या हिंसाचाराकडे सरकारने गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे. तर काँग्रेसचे उत्तर प्रदेश अध्यक्ष राज बब्बर यांनी या हिंसाचारावरून केंद्र आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.   28 सप्टेंबर रोजी एका बिहारी मजुराने  14 महिन्यांच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. त्यानंतर संपूर्ण गुजरातमध्ये आंदोलनांना सुरुवात झाली.  त्यातून उत्तर भारतीयांवर हल्ले होत असून, अनेक उत्तर भारतीय कुटुंबांनी राज्यातून पलायन केले आहे. उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांप्रकरणी आतापर्यंत 42 गुन्हे दाखल करण्यात आले असून, 342 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती गुजरातचे डीजीपी शिवानंद झा यांनी दिली आहे. 

टॅग्स :GujaratगुजरातPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस