शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

“पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही”; JDUचा राहुल गांधींवर पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2024 16:39 IST

Congress Vs JDU: राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, असा पलटवार जदयूने केला आहे.

Congress Vs JDU: ममता बॅनर्जी यांच्यानंतर आम आदमी पक्षासह जदयूने इंडिया आघाडीपासून फारकत घेतली. नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडत थेट भाजपासोबत जाऊन सत्तांतर घडवले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून राहुल गांधी यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली. राहुल गांधींनी केलेल्या टीकेवर जदयू नेत्यांनी पलटवार केला आहे. 

राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगाल, बिहारमध्ये आहे. बिहारमधील शेतकरी आर्थिक अन्यायाचे बळी पडत आहेत. आम्ही त्यांच्या हितासाठी लढत राहू. नितीश कुमार थोडाही दबाव सहन करू शकत नाहीत. ते लगेचच घुमजाव करतात. दबाव आला की पारडे बदलतात, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. याला आता जदयू नेते ललन सिंह यांनी उत्तर दिले आहे.

पंतप्रधान होण्याचे तुमचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही

तुमच्या दबावाखाली बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात आली, असे तुम्ही म्हणता. इतके मोठे खोटे कुणी बोलू शकत नाही. कदाचित तुम्हाला माहिती नसेल की, नितीश कुमार कधीही कोणत्याही दबावाखाली काम करत नाहीत. जातिनिहाय जनगणना हा नितीश कुमार यांचा निर्धार होता. जातिनिहाय जनगणनेचा मुद्दा नितीश कुमार यांनी व्ही.पी.सिंह यांच्या कार्यकाळात मांडला होता. तेव्हा तर तुमचा राजकीय उदयही झाला नव्हता. असत्याचा आधार कायम घेत राहिलात तर पंतप्रधान होण्याचे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही. तुम्ही पप्पू आहात आणि पप्पू राहाल. तुमच्या विनोदांमुळे देशाचे केवळ मनोरंजन होत राहील, या शब्दांत ललन सिंह यांनी हल्लाबोल केला. 

दरम्यान, इंडिया आघाडीच्या बंगळुरू आणि मुंबईतील बैठकीत जदयू पक्षाने ठराव मंजूर करायला सांगितला गेला, तेव्हा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोध केला. तेव्हा तुम्ही गप्प राहून त्यांना पाठिंबा दिला. देशाच्या राजकारणात काहीतरी साध्य करण्यासाठी खोट्या विधानांचा आधार घेऊ नका. यामुळेच तुमचा काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस अधिकाधिक ढासळत चालला आहे, अशी टीकाही ललन सिंह यांनी केली. 

टॅग्स :Janta Dal Unitedजनता दल युनायटेडBiharबिहारNitish Kumarनितीश कुमारRahul Gandhiराहुल गांधी