शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

"मोहम्मद अली जिना हे भारताचे महान स्वातंत्र्य सेनानी होते"; JDU नेत्याच्या विधानाने नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 14:45 IST

JDU Leader Khalid Anwar : जदयुचे आमदार खालिद अन्वर यांनी जिनांबाबत विधान केलं आहे.

नवी दिल्ली - समाजवाजी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी एका सभेत मोहम्मद अली जिना यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे वाद झाला होता. अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाचा मित्रपक्ष असलेल्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओमप्रकाश राजभर (Omprakash Rajbhar) यांनी जिनांबाबत केलेल्या विधानामुळे तो वाद आणखी वाढला. जर मोहम्मद अली जिना यांना देशाचे पहिले पंतप्रधान बनवले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असा दावा ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे. यानंतर आता जदयुचे आमदार खालिद अन्वर (JDU Leader Khalid Anwar) यांनी देखील जिनांबाबत विधान केलं आहे. "मोहम्मद अली जिना हे महान स्वातंत्र्य सेनानी होते" असं म्हटलं आहे. 

खालिद अन्वर यांनी "मोहम्मद अली जिना हे भारताचे एक महान स्वातंत्र्य सेनानी होते. त्यांना पाकिस्तानबद्दल आदर होता. ते एक मोठे नेते होते यामध्ये अजिबात शंका नाही. देशाच्या फाळणीला ते जबाबदार होतेच, पण त्यांच्याइतकेच भारताचे पहिले पंतप्रधान झालेले पंडित जवाहरलाल नेहरू आणि काँग्रेसदेखील फाळणीला जबाबदार होते" असं म्हटलं आहे. तसेच "काँग्रेसच्या फूट पाडा आणि राज्य करा या राजकारणामुळेच देशाची फाळणी झाली. काँग्रेस करत असलेल्या राजकारणाचा हा खरा चेहरा आहे. आणि त्याच प्रकारचं राजकारण काँग्रेस खेळत आली आहे" असं देखील अन्वर यांनी म्हटलं आहे. 

"देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार"

 एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी "देशाच्या फाळणीला काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच जबाबदार" असल्याचं म्हटलं आहे. ओवेसी यांनी उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये जाहीर सभेला संबोधित केलं. त्यामध्ये त्यांनी "मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), भारतीय जनता पार्टी (BJP) आणि समाजवादी पार्टी यांचे जे लोक इतिहास वाचत नाही, त्यांना आव्हान देतो. फाळणी मुस्लिमांमुळे किंवा जिना यांच्यामुळे झाली नाही. त्यावेळी फक्त तेच मुस्लिम मतदान करू शकत होते जे नवाब किंवा पदवीधारकांसारखे प्रभावशाली होते. काँग्रेस आणि त्यावेळचे नेतेच फाळणीसाठी जबाबदार होते" असं म्हटलं आहे. ओपी राजभर यांनी बुधवारी वाराणसीमध्ये मोहम्मद अली जिना यांना भारताचे पहिले पंतप्रधान केले असते तर देशाची फाळणी झाली नसती, असे विधान केल्यानंतर ओवेसी यांनी आता हे विधान केलं आहे. 

"उत्तर प्रदेश पोलिसांना तपास करणं माहीत नाही पण हत्या करणं माहितीय" 

ओवेसी यांनी कासगंज घटनेत तरुणाच्या मृत्यूबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांवर जोरदार निशाणा साधला आहे. "कासगंजची घटना तुमच्यासमोर आहे. अल्ताफच्या वडिलांना सांगण्यात आले की त्यांच्या मुलाने हुडीच्या तारने अडीच फूट उंच पाण्याच्या नळाला गळफास लावून आत्महत्या केली. परंतु कासगंज पोलिसांनीच त्या तरुणाची हत्या केली आहे. उत्तर प्रदेश पोलिसांना तपास करणे माहीत नाही पण हत्या करणं माहीत आहे" असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारण