शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

कर्नाटकमध्ये जेडीएसने केली 12 जागांची मागणी, मनधरणीसाठी काँग्रेसने केले दिग्गजांना पाचारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2019 16:13 IST

कर्नाटकमध्ये आघाडी करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे.

बंगळुरू - कर्नाटकमध्ये आघाडी करून सत्तेवर आलेल्या काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आता वर्चस्वाची लढाई सुरू झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्यासाठी जेडीएसने काँग्रेसवर दबाव आणण्यासाठी चाली खेळण्यास सुरुवात केली असून, कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 12 जागांची मागणी केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या चिंतेत वाढ झाली आहे. जेडीएसबरोबर निर्माण झालेला हा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्याकडे मदत मागितली आहे.  चंद्राबाबू नायडू,  शरद पवार आणि  फारुख अब्दुल्ला या तिन्ही ज्येष्ठ नेत्यांनी एनडीएविरोधात राष्ट्रीय आघाडी बनवण्यासाठी येत असलेले अडथळे दूर करण्याची जबाबदारी स्वीकारावी, अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. दरम्यान, चंद्राबाबू नायडू यांनी नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली आहे. आता हे तिन्ही नेते जानेवारीच्या मध्यावर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करणार आहेत.  प्रादेशिक पक्षांनी आपण जिंकू शकतो एवढ्याच जागांची मागणी केली पाहिजे, असे टीडीपीचे प्रवक्ते कमबमपती राममोहन राव म्हणाले. कर्नाटकमध्ये आघाडीचा निर्णय झाल्यानंतर सर्वपदांचे वाटप 2:1 अशा पटीत व्हावे, असे निश्चित करण्यात आले होते. या फॉर्म्युल्यानुसार जेडीएसला कर्नाटकमध्ये एकूण दहा जागा मिळू शकतात. मात्र देवेगौडा यांनी एकूण 12 जागांसाठी आग्रह धरला आहे. तसेच देवैगौडा यांनी चिक्काबल्लूपुरा या जागेवरही दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेस अडचणीत आली आहे.  चिक्काबल्लूपुरा जागेवर सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विरप्पा मोईली हे खासदार आहेत.  

टॅग्स :Karnatakकर्नाटकJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)congressकाँग्रेस