शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

जेडीयूचा बाण अखेर नीतीश कुमारांच्याच भात्यात, निवडणूक आयोगाचा शरद यादवांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 17:13 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शरद यादवांमध्ये संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादात अखेर नितीश कुमार यांची सरशी झाली आहे.

पाटणा - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि शरद यादवांमध्ये संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादात अखेर नितीश कुमार यांची सरशी झाली आहे. निवडणूक आयोगाने संयुक्त जनता दलाच्या निवडणूक चिन्हावरून सुरू झालेल्या वादावर निकाल देताना नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला बाण हे चिन्ह दिले आहे. त्याबरोबर छोटूभाई अमरसंग वसावा यांनी आपल्याच गटाला खरा संयुक्त जनता दल पक्ष म्हणून मान्यता द्यावी म्हणून दाखल केलेली याचिकाही निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासमोर आव्हान उभे करणाऱ्या शरद यादव यांना धक्का बसला आहे.  बिहारमधील महाआघाडी तुटल्यानंतर शरद यादव आणि नितीश कुमार यांच्यामध्ये तीव्र मतभेद निर्माण झाले होते. नितीश कुमार यांनी भाजपासोबत आघाडी करण्याच्या घेतलेल्या निर्णयास शरद यादव यांनी विरोध केला होता. त्यातून संयुक्त जनता दलामध्ये दोन गट पडले होते. तसेच दोन्ही गटांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेल्या बाणावर आपला दावा केला होता.  मात्र संयुक्त जनता दलाचे बहुसंख्य आमदार आणि खासदार नितीश कुमार यांच्यासोबत होते.  आता आगामी गुजरात निवडणुकीत संयुक्त जनता दल आपल्या परंपरागत चार ते पाच मतदार संघांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार आहे. याबाबत जेडीयूचे प्रवक्ते के.सी. त्यागी यांनी सांगितले की, राज्यसभा सदस्य वगळता सर्व आमदार आणि खासदारांनी नितीश कुमार यांना पाठिंबा दिला. तसेच यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे शपथपत्रही सादर करण्यात आले होते. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांच्या गटाने सोमवारी निवडणूक आयोगाची भेट घेऊन निवडणूक चिन्हावर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली होती. गुजरात निवडणुकीत आम्हाला निवडणूक चिन्हाचा वापर करता येऊ नये, यासाठी शरद यादव यांचा गट हा वाद लांबवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप नितीश कुमार गटाने केला होता.   

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमार