शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

जदयू आमदारांचा नितीश कुमारांना घरचा आहेर; तेजस्वी यादवांचे केले कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2020 11:19 IST

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली - बिहारमध्ये जनता दल युनायटेडच्या  आमदाराने आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. बिहारमधील सरकार बेरोजगारी हटविण्यासाठी काहीही काम करत नसल्याचा आरोप आमदार अमरनाथ गामी यांनी केला आहे. बिहारमध्ये नोकऱ्या नाही. त्यामुळेच लोक बिहार सोडून जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर दुसऱ्या आमदाराने राष्ट्रीय जनता दलचे नेते तेजस्वी यादव यांनी बेरोजगारीविरुद्ध सुरू केलेल्या यात्रेचे कौतुक केले आहे.

बिहारमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. अन्यथा लोक बिहार सोडून गेले नसते. तेजस्वी यादव बेरोजगारी हटाव यात्रा काढत आहेत. मात्र त्यामुळे फारसा फायदा होणार नाही. केंद्र सरकारच्या मदतीशिवाय बेरोजगारी हटविणे सोपे नाही. बिहारमधील कोणत्याच सरकारने बेरोजगारी समोर ठेवून काम केले नसल्याचे गामी यांनी सांगितले आहे.

याव्यतिरिक्त जदयूचे आमदार जावेद इकबाल अन्सारी यांनी देखील सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, मागील 10-15 वर्षांपासून बेरोजगारीमुळे बिहारमधून अनेकजन पलायन करत आहेत. विरोधी पक्षांकडून 'बेरोजगारी हटाव' यात्रा काढण्यात येत आहे. लोक कामासाठी दुसऱ्या राज्यात जात आहेत. तिथे त्यांना अपमान सहन करावा लागतो. त्यामुळे युवकांच्या प्रश्नावर मैदानात उतरणाऱ्यांचे कौतुकच करायला हवे, असं सांगताना त्यांनी राजदच्या यात्रेचे समर्थन केले आहे.

राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे.