जेसीबी चालकाचे पाकिट मारले
By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:54+5:302015-01-23T01:05:54+5:30
जेसीबी चालकाचे पाकिट मारले

जेसीबी चालकाचे पाकिट मारले
ज सीबी चालकाचे पाकिट मारलेरेल्वेस्थानकातील घटना : चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची शंकानागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याचे दिसत असून गुरुवारी चौकशी कक्षात रेल्वेगाडीची चौकशी करीत असलेल्या एका जेसीबी चालकाचे पाकिट पळविल्याची घटना सायंकाळी ५ वाजताच्या दरम्यान घडली.गुंडु शिवाजी राठोड (२३) रा. गुलबर्गा कर्नाटक हा जेसीबी चालविण्याचे काम करतो. तो कामानिमित्त नागपुरात आला होता. गुलबर्गा येथे परत जाण्यासाठी तो नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील मुख्य प्रवेशद्वाराच्या शेजारी असलेल्या चौकशी कक्षात गाडीची चौकशी करण्यासाठी गेला. त्याला जेसीबी चालविण्याचा १० हजार रुपये महिना मिळतो. गर्दीत अज्ञात पाकिटमाराने त्याचे पाकिट मारले. त्याच्या पाकिटात ८ हजार ३०० रुपयांची रक्कम होती. दरम्यान तेथे लोहमार्ग पोलिसाचा एकही शिपाई ड्युटीवर उपस्थित नव्हता. बाजूलाच आरपीएफचे तीन जवान बॅग स्कॅनरवर असतात. परंतु त्यांना पाहूनही चोरटे चौकशी कक्षाजवळ चोऱ्या करीत असल्यामुळे त्यांची हिंमत किती वाढली हे या घटनेवरून स्पष्ट होते. चौकशी कक्षाजवळून अनेक प्रवाशांचे पाकिट, मोबाईल चोरीला गेले आहेत. परंतू तरीसुद्धा लोहमार्ग पोलीस तेथे बंदोबस्त लावत नसल्यामुळे चोरट्यांचे फावत आहे. दरम्यान मिळालेल्या पगारातील सर्वच रक्कम चोरीला गेल्यामुळे या जेसीबी चालकाच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट होते. चौकशी कक्षाजवळ आणि पश्चिमेकडील चालू तिकीट कार्यालयात एकही पोलीस उपस्थित राहत नसून या परिसरात चोरट्यांच्या हालचाली वाढल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)