जयललितांच्या शिक्षेला स्थगिती; कोर्टाचा दिलासा
By Admin | Updated: October 18, 2014 02:16 IST2014-10-18T02:16:10+5:302014-10-18T02:16:10+5:30
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केल्याने तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाच्या प्रमुख जे. जयललिता घरी राहून दिवाळी साजरी करू शकणार आहेत.

जयललितांच्या शिक्षेला स्थगिती; कोर्टाचा दिलासा
नवी दिल्ली : 66.65 कोटी रुपयांची अपसंपदा जमविल्याच्या गुन्ह्याबद्दल बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने ठोठावलेली चार वर्षाची कैद आणि 1क्क् कोटी रुपये दंडाची शिक्षा तहकूब ठेवत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अंतरिम जामीन मंजूर केल्याने तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री व अण्णाद्रमुक पक्षाच्या प्रमुख जे. जयललिता घरी राहून दिवाळी साजरी करू शकणार आहेत.
शिक्षा होताच मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागलेल्या जयललिता 27 सप्टेंबरपासून बंगळुरू येथील कारागृहात आहेत. विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध केलेले अपील कर्नाटक उच्च न्यायालयाने 7 ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी दाखल करून घेतले होते; परंतु त्यांना जामिनावर सोडण्यास किंवा शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. जयललिता यांच्यासोबत एन. शशिकला, व्ही.एन. सुधाकरन व श्रीमती जे. ईलावारसी यांनाही शिक्षा झाल्या आहेत. उच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध जयललिता व इतर तिघांनी केलेल्या विशेष अनुमती याचिकांवर ज्येष्ठ वकील फली नरिमन व के.टी.एस. तुलसी यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतर सरन्यायाधीश न्या. एच.एल. दत्तू, न्या. मदन लोकूर व न्या. ए.के.
सिक्री यांच्या खंडपीठाने चौघाही आरोपींच्या शिक्षा तहकूब करीत त्यांना दोन
महिन्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर
केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आपल्या लाडक्या ‘अम्मा’ अखेर तुरुंगातून सुटून घरी येणार अशी बातमी येताच त्यांच्या समर्थकांनी चेन्नईमधील मुख्यालयाबाहेर मिठाई वाटून दिवाळी साजरी केली.
खरेतर अण्णाद्रमुक पक्षाचा शुक्रवारी
स्थापना दिन होता. सकाळी पक्ष मुख्यालयात त्यानिमित्त झालेल्या कार्यक्रमावर अम्मांच्या तुरुंगवासाचे सावट होते.