जयललितांची सुनावणी शुक्रवारी
By Admin | Updated: October 14, 2014 01:44 IST2014-10-14T01:44:58+5:302014-10-14T01:44:58+5:30
कोटय़वधी रुपयांच्या अपसंपदाप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अण्णाद्रमुक प्रमुख ज़े जयललिता यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार आह़े

जयललितांची सुनावणी शुक्रवारी
नवी दिल्ली : कोटय़वधी रुपयांच्या अपसंपदाप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या अण्णाद्रमुक प्रमुख ज़े जयललिता यांच्या जामीन याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 17 ऑक्टोबर रोजी सुनावणी करणार आह़े
या आठवडय़ात जामीन अर्जावर सुनावणी करण्याची जयललितांची विनंती सरन्यायाधीश एच़एल़ दत्तू यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सोमवारी मान्य केली आणि सुनावणीसाठी 17 ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली़ दिवाळीपूर्वी तुरुंगाबाहेर यायचे झाल्यास जयललितांजवळ 17 ऑक्टोबरचा दिवस हा अंतिम दिवस असेल़ कारण शुक्रवारनंतर सर्वोच्च न्यायालयास एक आठवडय़ाची सुटी आह़े