जयललितांसाठी आमदाराचा राजीनामा
By Admin | Updated: May 18, 2015 02:48 IST2015-05-18T02:48:29+5:302015-05-18T02:48:29+5:30
अण्णाद्रमुकचे आमदार पी. वेत्रिवेल यांनी रविवारी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे कारण

जयललितांसाठी आमदाराचा राजीनामा
चेन्नई : अण्णाद्रमुकचे आमदार पी. वेत्रिवेल यांनी रविवारी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्याचे कारण पक्षाने जाहीर केलेले नसले तरी पक्षप्रमुख जे. जयललिता यांचा विधानसभेत निवडून येण्याचा आणि मुख्यमंत्रिपदी पुन्हा आरूढ होण्याचा मार्ग मोकळा करण्याच्या उद्देशानेच वेत्रिवेल यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचे सांगितले जाते.
२२ मे रोजी अण्णाद्रमुक विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली असून या बैठकीत जयललिता यांची नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. (वृत्तसंस्था)