जयललिता तुरुंगातच; आज सुनावणी
By Admin | Updated: October 1, 2014 02:07 IST2014-10-01T02:07:55+5:302014-10-01T02:07:55+5:30
अपसंपदा खटल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अण्णाद्रमुक प्रमुख ज़ेजयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आह़े

जयललिता तुरुंगातच; आज सुनावणी
>बंगळुरू: अपसंपदा खटल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या अण्णाद्रमुक प्रमुख ज़ेजयललिता यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने काहीसा दिलासा दिला आह़े जयललितांना तात्काळ जामीन मिळावा तसेच त्यांचे दोषत्व आणि शिक्षा निलंबित ठेवावी, या अर्जावर आज बुधवारी सुनावणी करण्यास न्यायालय राजी झाले आह़े
प्रारंभी मंगळवारी सकाळी सुटीकालीन खंडपीठाच्या न्यायाधीश रत्नकला यांनी जयललितांच्या जामिनावरील सुनावणी 6 ऑक्टोबर्पयत पुढे ढकलली होती़ मात्र ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांच्या नेतृत्वाखाली जयललितांच्या बचावासाठी उभ्या असलेल्या वकिलांच्या फौजेने यानंतर तात्काळ न्यायालयाच्या रजिस्ट्रारकडे धाव घेतली आणि या प्रकरणाची त्वरित सुनावणी घेण्याची विनंती केली़ मुख्य न्यायाधीश न्या़ डी़एच़ वाघेला यांनी ही विनंती मान्य केली़
फौजदारी प्रक्रियासंहितेच्या कलम 389 अंतर्गत प्रलंबित अपिलावर सुनावणी होईर्पयत जयललितांची शिक्षा निलंबित ठेवण्याची तसेच त्यांना तात्काळ जामिनावर सोडण्याची विनंती केली़ कलम 389 अंतर्गत दोषी व्यक्तीने दाखल केलेले कुठलेही अपील प्रलंबित असेल तर अपिली न्यायालय शिक्षा निलंबित ठेवण्याचा आदेश देऊ शकत़े (वृत्तसंस्था)
याशिवाय व्यक्ती तुरुंगात असेल तर जामीन वा वैयक्तिक मुचलक्यावर त्याची सुटका केली जाऊ शकत़े
जयललिता यांनी सोमवारी कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ शिक्षेविरुद्ध दाद मागतानाच जयललितांनी जामिनासाठीही अर्ज केला होता़ त्यांचे तीन निकटचे सहकारी शशिकला, व्ही़ एऩ सुधाकरन आणि इलावरासी यांनीही उच्च न्यायालयात याचिका दाखल करून आपल्या शिक्षेला आव्हान देत जामीन अर्ज दाखल केला होता़ आपल्यावरील अपसंपदा गोळा केल्याचे आरोप खोटे आहेत़ कायदेशीर मार्गाने आपण संपत्ती मिळविल्याचे जयललितांनी आपल्या अर्जात म्हटले आह़े अपसंपदा खटल्याप्रकरणी जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षे कैदेची शिक्षा ठोठावली आह़े (वृत्तसंस्था)