जयललितांना तुरुंगवास
By Admin | Updated: September 28, 2014 03:30 IST2014-09-28T03:30:52+5:302014-09-28T03:30:52+5:30
16 वर्षापूर्वीच्या एका भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरून चार वर्षाचा कारावास भोगण्यासाठी तुरुंगात रवानगी झाल्याने अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार आहे.

जयललितांना तुरुंगवास
>भ्रष्टाचाराच्या खटल्यात दोषी : चार वर्षे कारावास, 1क्क् कोटींचा दंड
बंगळुरू/चेन्नई : 16 वर्षापूर्वीच्या एका भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरून चार वर्षाचा कारावास भोगण्यासाठी तुरुंगात रवानगी झाल्याने अण्णा द्रमुकच्या प्रमुख जे. जयललिता यांना तामिळनाडूचे मुख्यमंत्रिपद सोडावे लागणार आहे. विधानसभेत भक्कम पाठबळ असूनही सत्तेवरून जाण्याची नामुश्की जयललितांवर आली आहे. 1क्क् कोटींचा दंडही त्यांना ठोठावला आहे. तसेच 6 वर्षाची अपात्रताही लागू होणार असल्याने पुढील विधानसभा निवडणूकही जयललिता लढवू शकणार नाहीत. 1996मध्ये मुख्यमंत्रिपदाची पहिली कारकिर्द संपल्यानंतर लगेचच कट्टर शत्रू असलेल्या द्रमुक सरकारने दाखल केलेल्या 6क्.65 कोटी रुपयांची अपसंपदा जमा केल्याच्या खटल्यात बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांना चार वर्षाचा तुरुंगवास व तब्बल 1क्क् कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. (वृत्तसंस्था)
कडक पोलीस बंदोबस्तात न्यायाधीश जॉन मायकेल डिकुन्हा यांनी हा निकाल सुनावताच जयललिता यांना छातीत दुखून अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना आधी इस्पितळात नेऊन नंतर बंगळुरू मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली.
नामुश्कीत पहिला नंबर
च्मुख्यमंत्रिपदावर असताना भ्रष्टाचार खटल्यात दोषी ठरून तुरुंगात जाण्याच्या नामुश्कीत जयललिता यांनी पहिला नंबर पटकावला आहे. 100 कोटी रुपयांचा दंड झालेल्या त्या पहिल्याच राजकीय नेत्या आहेत.
च्दोषी ठरल्यावर लोकप्रतिनिधीचे पद लगेच जाईल या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा फटका बसलेल्या पहिल्या नेत्या.
च्जयललिता यांच्या निकटस्थ सहकारी शशिकला आणि शशिकला यांचा भाचा सुधाकरन व भाची इलावरासी यांनाही न्यायालयाने चार वर्षाच्या कारावासाची व प्रत्येकी 10 कोटी रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली. -
3 वर्षाहून जास्त शिक्षा झाल्याने जयललिता यांनी जामिनासाठी अर्ज केला नाही किंवा शिक्षेला स्थगितीही मागितली नाही, कारण न्यायाधीशांना तो अधिकारच नव्हता.
आता कर्नाटक उच्च न्यायालयात शिक्षेला नव्हे, तर दोषित्वालाही स्थगिती मिळविण्यात यश मिळाले तरच जयललिता यांचे मुख्यमंत्रिपद टिकण्याची शक्यता आहे. जयललितांनंतर मुख्यमंत्रिपदी कोण, हा प्रश्नच आहे.
निकाल जाहीर होताच त्याचे तीव्र पडसाद तामिळनाडूत उमटले व अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक व बस पेटविणो असे प्रकार घडले. द्रमुक नेते एम. करुणानिधी व हे प्रकरण लावून धरणारे भाजपाचे नेते डॉ. सुब्रrाण्यम स्वामी यांचे पुतळे संतप्त जमावाने जाळले.