जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न
By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:40+5:302015-01-30T21:11:40+5:30
नवी दिल्ली- समाजवादी पक्षातून निलंबित झालेल्या जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न सुरू असून, तसे करून आपण फक्त सेवाकार्य करू इच्छितो, कुठल्याही पदाची लालसा आपल्याला नाही असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. भाजपात सामील होण्याकरिता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असून कुठलीही निवडणूक लढविण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न
न ी दिल्ली- समाजवादी पक्षातून निलंबित झालेल्या जयाप्रदाचा भाजपाच्या तंबूत शिरण्याचा प्रयत्न सुरू असून, तसे करून आपण फक्त सेवाकार्य करू इच्छितो, कुठल्याही पदाची लालसा आपल्याला नाही असे या अभिनेत्रीचे म्हणणे आहे. भाजपात सामील होण्याकरिता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू असून कुठलीही निवडणूक लढविण्यात आपल्याला रस नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.आपचे नेते केजरीवाल यांच्या विरुद्ध मैदानात उतरण्याच्या शक्यतेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी, मी तसे कधी म्हटले नाही, मला भाजपात प्रवेश करायचा आहे. मात्र प्रसिद्धीमाध्यमांनी त्याला जास्त फुगवून सांगितले. तिकिट वाटपाबाबत मी काही बोलले नाही असे म्हटले. मुलायम सिंग यांच्यासोबत काम करताना आलेल्या कडवट अनुभवांचा उल्लेख करून त्यांनी आता आपण नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात काम व एक निरोगी राजकारण करू इच्छितो असे म्हटले. सपात असताना मुलींना इंग्रजी व संगणकाचे शिक्षण दिले पाहिजे असे मत व्यक्त केल्यानंतर यादव यांनी त्यावर, मुलींसाठी ते योग्य नाही असे सांगून असहमती व्यक्त केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आपण नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने भारताला पुढे नेत आहेत व अन्य लोकांनाही तसे करण्यास प्रेरित करीत आहेत त्याने आपण प्रभावित झाल्याचे जयाप्रदाने सांगितले. आपल्या भाजपा प्रवेशासाठी आपले राजकीय गुरू अमरसिंग बोलणी करीत असल्याची माहिती त्यांनी पुढे दिली. यासंदर्भात जो निर्णय होईल तो आपण जाहीर करू असे त्या पुढे म्हणाल्या.