शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

“लवकरच तुमचे वाईट दिवस येणार”; जया बच्चन यांचा सत्ताधाऱ्यांना शाप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 06:08 IST

ऐश्वर्याच्या चौकशीमुळे नाराजी

नितीन अग्रवाल, लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पनामा पेपर्स प्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची अंमलबजावणी संचालनालयाने चाैकशी केली. त्यानंतर त्यांची सासू आणि राज्यसभा सदस्य जया बच्चन या चांगल्याच भडकल्या. लवकरच तुमचे वाईट दिवस येणार आहेत,  असा शाप त्यांनी सत्ताधारी भाजपच्या सदस्यांना दिला. जया बच्चन एवढ्या संतापल्या हाेत्या, की बाेलताना त्यांना श्वास घ्यायला त्रास हाेऊ लागला. 

सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, तुम्ही आमचा गळा आवळा. तुम्हीच सभागृह चालवा. तुम्ही या सभागृहाच्या किंवा बाहेर बसलेल्या १२ सदस्यांबद्दल काय करत आहात? आम्हाला न्याय हवा आहे. मात्र, सत्तेकडून तशी अपेक्षा करू शकत नाही. उपसभापती भुवरेश्वर कालिका यांच्यावरही जया बच्चन उखडल्या. त्या म्हणाल्या की, तुम्ही बाेलूच नका. बाेलायची मला संधी आहे. अनेक माेठे मुद्दे आहेत. मात्र, केवळ एका कारकुनी चुकीमुळे ३-४ तास चर्चेसाठी देता. काय सुरू आहे? हे लाजिरवाणे आहे. जया बच्चन यांच्या वक्तव्यानंतर सभागृहात माेठा गदाराेळ झाला आणि त्यानंतर कार्यवाही स्थगित करण्यात आली. जया बच्चन यांचा मुलगा अभिषेक यांच्यापाठाेपाठ सून ऐश्वर्या यांनाही ईडीने चाैकशीसाठी दिल्लीत बाेलाविले हाेते. त्यानंतर जया बच्चन प्रचंड नाराज दिसल्या. 

टॅग्स :ParliamentसंसदJaya Bachchanजया बच्चन