शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

जया बच्चन देशातील सर्वात श्रीमंत खासदार; संपत्तीत 100 टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 10:04 IST

विशेष म्हणजे २०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती 493 कोटी रुपये इतकी होती.

नवी दिल्ली: समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या देशातील सर्वात श्रीमंत खासदार ठरण्याची शक्यता आहे. त्यांनी राज्यसभा निवडणुकीच्यानिमित्ताने नुकताच आपल्या संपत्तीचा तपशील जाहीर केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपल्याजवळ 1000 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे जया बच्चन या देशातील सर्वात श्रीमंत खासदार ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी हा बहुमान खासदार रविंद्र किशोर सिन्हा यांच्याकडे होता. सिन्हा तब्बल 800 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. विशेष म्हणजे २०१२ मध्ये जया बच्चन यांची संपत्ती 493 कोटी रुपये इतकी होती. मात्र, आता यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. प्रतिज्ञापत्रानुसार जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या नावे 460 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असून 540 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता आहे. बच्चन दाम्पत्याकडे सोने, चांदी आणि हिऱ्यांच्या मौल्यवान दागिन्यांच्या स्वरुपात 62 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये जया बच्चन यांच्याकडील 26 कोटींच्या दागिन्यांचा समावेश आहे. याशिवाय, बच्चन दाम्पत्याकडे 12 गाड्या असून त्यांची किंमत 13 कोटी रुपयांच्या घरात आहे. तसेच फ्रान्समध्येही बच्चन दाम्पत्याची संपत्ती असून याशिवाय नोएडा, भोपाळ, पुणे, अहमदनगर आणि गांधीनगर या शहरांमध्येही त्यांनी मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली आहे. 

काही दिवसांपूर्वी समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांची पक्षाच्या राज्यसभेच्या उमेदवार म्हणून घोषणा केली होती. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने आणि अखिलेश यादव यांनी जया बच्चन यांच्यासाठी तिकीट कापल्यामुळे नरेश अग्रवाल नाराज होते. त्यांनी सोमवारीच जया बच्चन यांच्यावर आक्षेपार्ह टीका करत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

टॅग्स :Jaya Bachchanजया बच्चनAmitabh Bachchanअमिताभ बच्चन