जवाहरलाल दर्डा शालेय फुटबॉल
By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:41+5:302014-12-18T00:40:41+5:30
जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धा

जवाहरलाल दर्डा शालेय फुटबॉल
ज ाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धाबीव्हीएमच्या विजयात साहिलचे दोन गोलनागपूर: साहिलने नोंदविलेल्या दोन गोलमुळे श्रीकृष्णनगर येथील भारतीय विद्या भवन्स संघाने बुधवारी जवाहरलाल दर्डा स्मृती शालेय फुटबॉल स्पर्धेत जैन इंटरनॅशनल स्कूलचा ४-० ने पराभव केला. नागपूर जिल्हा फुटबॉल संघटनेतर्फे अजनीच्या मध्य रेल्वे मैदानावर आयोजित ही स्पर्धा लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडने पुरस्कृत केली आहे.या सामन्यातील मध्यांतरापर्यंतचा खेळ निरस झाला. उत्तरार्धात मात्र बीव्हीएमने आक्रमक खेळ करीत अखेरच्या २२ मिनिटांत तब्बल चार गोल मारले. उत्कर्ष धापोडकरने खाते उघडल्यानंतर मयूर कातुरेने ४३ व्या मिनिटाला दुसरा गोल केला. साहिलने नंतर ६७ आणि ८० व्या मिनिटांना लागोपाठ दोन गोल केले.दुसऱ्या सामन्यात दाभा येथील सेंटर पॉईंट संघाने सेंट ॲन्नेस शाळेचा २-० ने पराभव केला. मध्यांतराला खेळ थांबला त्यावेळी दाभा संघ १-० ने आघाडीवर होता.श्रेयस बोरा याने सातव्या मिनिटाला गोल केला. सामना संपायला एक मिनिटांचा अवधी असताना कुणाल खंडेलवाल याने संघाचा दुसरा गोल नोंदवित विजयावर शिक्कामोर्तब केले.तिसऱ्या सामन्यात मौन्टफोर्ट स्कूलने सेंट झेव्हियर्स हिंगणा संघावर १-० ने विजय साजरा केला. सामन्यात निर्णायक ठरलेला गोल ४७ व्या मिनिटाला गौरव कोठारी याने नोंदविला.उद्या गुरुवारी सकाळी ८ वाजेपासून अंजूमन हायस्कूलविरुद्ध भवन्स श्रीकृष्णनगर, के. जॉन पब्लिक स्कूलविरुद्ध राजेंद्र हायस्कूल आणि सीपीएस दाभाविरुद्ध सेंट जॉन्स स्कूल हे सामने खेळविले जातील.(क्रीडा प्रतिनिधी).......................................................................... नागपूर सिटीची विजयी सलामीएनडीएफएद्वारा याच मैदानावर खेळविल्यात आलेल्या ज्युनियर साखळी सामन्यात नागपूर सिटी संघाने न्यू ईरा फुटबॉल क्लबचा ३-० ने पराभव करीत विजयी सलामी दिली. विजयी संघाकडून हितेश हारोडे ३६व्या, तौफिक शेख याने ५० व्या आणि सुमित गावंडेने ५८ व्या मिनिटाला गोल नोंदविले. उद्या गुरुवारी या गटात सिटी एफसीविरुद्ध बिगबेन हा सामना दुपारी १ पासून तसेच बिरसा मुंडा क्लबविरुद्ध क्रीडा मंडळ गुमगाव हा सामना दुपारी २.३० पासून खेळविला जाईल......................................................................