विंचूर शिवसेना शहर प्रमुखपदी जेऊघाले
By Admin | Updated: December 14, 2015 19:11 IST2015-12-14T19:11:35+5:302015-12-14T19:11:35+5:30

विंचूर शिवसेना शहर प्रमुखपदी जेऊघाले
>विंचूर : विंचूर शिवसेना शहर प्रमुखपदी ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब लक्ष्मण जेऊघाले यांची, तर उपशहरप्रमुखपदी नीलेश बाळासाहेब दरेकर यांची नियुक्ती करण्यात आली. दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख व उपनेते सुहास सामंत यांच्या सूचनेवरून ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी अहेर यांच्या हस्ते त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर पवार, उपतालुकाप्रमुख निवृत्ती जगताप, पंचायत समिती सदस्य राजाराम दरेकर, ग्राहक मंच शहराध्यक्ष नीलेश गायकवाड, युवा सेना शहरप्रमुख सचिन दरेकर उपस्थित होते. नानासाहेब जेऊघाले यांनी सलग दुसर्यांदा ग्रामपंचायतीत मताधिक्क्याने निवडून येत वॉर्डातील विकासकामांमुळे सर्वसामान्यांमध्ये वेगळाच ठसा उमटविला आहे. जेऊघाले यांची नियुक्ती झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. साद्री प्रतिष्ठाण, गावातील विविध संघटना, मंडळ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला, तर सद्दाम शेख, राहुल कापसे, मनोज शिरसाठ, साजीद पठाण, नागेश मुदगुल, प्रवीण कांगणे, सुलतान पठाण, सुशील सोनी, वैभव थोरात, पप्पू निकाळे, सागर गलांडे, मयूर भड, अक्षय सोनी, सतीश सोनवणे, राहुल कर्पे, तुषार कापसे, मंगेश रणधीर, मसर शेख, अजय नेवगे, पप्पू सूर्यवंशी, मॉन्टी खंडिझोड, सुनील सानप, गोरख सोनवणे, वसीम अत्तार यांनी अभिनंदन केले. (१४ (फोटो १४ जेऊघाले, दरेकर)