२३ जानेवारी कुजबूज
By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:27+5:302015-01-23T23:06:27+5:30
कुजबूज--(२३ जानेवारी-सद्गुरू)

२३ जानेवारी कुजबूज
क जबूज--(२३ जानेवारी-सद्गुरू)फक्त बुथ अध्यक्षपणजी हे राजधानीचे शहर. या शहरात काँग्रेस हाउस म्हणजे गोव्यातील काँग्रेसचे मुख्यालयही आहे. अशा ठिकाणी तरी काँग्रेस पक्ष संघटना बळकट असायला नको काय? परवा फालेरो यांनीच पत्रकार परिषदेनंतर चहा पिताना अनौपचारिकपणे सांगितले, की पणजीत काँग्रेसजवळ फक्त बुथ समितीचा अध्यक्ष तेवढा आहे. बाकी बुथ समितीदेखील नाही. आता बोला. सुभाष शिरोडकर, जॉन फर्नांडिस हे माजी प्रदेशाध्यक्ष पणजीत बुथ समिती स्थापन करू शकले नाहीत. फालेरो हे प्रदेशाध्यक्ष बनून तीन महिने झाले; पण तेही बुथ समिती नियुक्त करू शकले नाहीत. आता पणजीसाठी प्रचार समिती शोधण्याकरिता धावपळ चालली आहे. सुरेंद्र फुर्तादो यांनाच प्रचार समिती तुम्ही तयार करा, असे सांगण्यात आले आहे. अशी स्थिती असताना हा पक्ष राज्यात सत्तेवर येण्याची स्वप्ने पाहत आहे. गुरुवारी जर काँग्रेसची पणजीत कार्यकारिणी बैठक नसती तर फुर्तादो यांच्यासोबत उमेदवारी अर्ज भरताना पंधरा माणसेही दिसली नसती. केवळ राणे, फालेरो, फुर्तादो व त्यांचे दोन-तीन मित्र तेवढे दिसले असते. दिनार तारकर यांनी २००७ साली काँग्रेसची निवडणूक लढवताना मंगेश वायकर वगैरे कार्यकर्त्यांना जवळ केले होते. ते टापटीप वायकर महाशय सध्या भाजपच्या प्रचारात मग्न आहेत..............................परफॉर्मन्स दाखवा ना...मगो पक्षाचे मंत्री आपल्या मतदारसंघात येत आहेत व तिथे कामे करत असल्याने आमची अडचण होत आहे, असे भाजपचे काही मंत्री व आमदार अलिकडे वारंवार सांगतात. मगोचे मंत्री आमच्या मतदारसंघात येऊन परफॉर्मन्स दाखवतात, अशी तक्रार वारंवार भाजपवाले करत असल्याने एका वृत्त वाहिनीवरील चर्चात्मक कार्यक्रमावेळी मगोचे आमदार लवू मामलेदार यांनी भाजपवाल्यांना उत्तर दिले आहे. मगोचे मंत्री परफॉर्मन्स दाखवत असतील तर तुम्हीही परफॉर्मन्स दाखवा ना, असा सल्ला लवू मामलेदार यांनी भाजपच्या मंत्र्यांना दिला आहे. अर्थात, मामलेदार यांचा सल्ला पटण्यासारखाच आहे. प्रियोळ व फोंडा मतदारसंघ हे मगो पक्षाकडे असताना भाजपवाले येऊन या मतदारसंघात काम करतात, त्यांना आम्ही अडवत नाही. पर्यटन, उद्योग अशी अनेक महत्त्वाची खाती भाजपच्या मंत्र्यांकडे आहे. त्या खात्यांनी सर्वत्र परफॉर्मन्स दाखवा ना, असे मामलेदार म्हणतात.