जनसेवा सार्वजनिक वाचनालय, गोवर्धन, गंगापूर रोड
By Admin | Updated: July 8, 2016 01:05 IST2016-07-08T00:03:27+5:302016-07-08T01:05:54+5:30
नाशिक पासून जवळच असलेल्या गंगापूर रोड येथील गोवर्धन येथे मातोश्री रमाबाई आंबेडकर सभागृहात गावातील समविचारी आणि सामाजिक कार्याची आवड असणा-या गावक-यांनी एकत्र येऊन गोवर्धन येथे ऑगस्ट २००८ मध्ये सार्वजनिक वाचनालयाची स्थापना केली. सुरवातीला घरातील पाच पुस्तकापासून गावातील चावडीमध्ये वाचनालयाची सुरूवात करण्यात आली. वाचक संस्कृती वृध्दिंगत व्हावी यासाठी चावडी वाचनालयावर मर्यादा येत असल्याने गोवर्धन ग्रामपंचायतीकडे रमाबाई आंबेडकर सभागृहामागील खोलीची मागणी करण्यात आल्यानंतर या जागेत कायमस्वरूपी वाचनालयास सुरूवात करण्यात आली.

जनसेवा सार्वजनिक वाचनालय, गोवर्धन, गंगापूर रोड
class="web-title summary-content">Web Title: Janseva Public Library, Govardhan, Gangapur Road