शहरं
Join us  
Trending Stories
1
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
2
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
3
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
4
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
5
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
6
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
7
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
8
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
9
जगातील सर्वात मोठे स्टेडियम ते स्टॅच्यू ऑफ युनिटी... बांधणारी L&T चे खरे मालक कोण? कुठे झाली स्थापना?
10
कसा नियतीचा खेळ हा... ट्रकला धडकून मोठ्या भावाचा मृत्यू, मृतदेह घ्यायला निघालेल्या लहान भावाचाही रस्त्यावरच अंत!
11
ट्रम्प यांनी केलेला युद्धविराम हमासने तोडला की इस्रायलने? हवाई हल्ले, रणगाड्यांच्या तोफांनी गाझा हादरला, १८ ठार
12
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
13
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य
14
प्रकट दिन: कैलास का रहनेवाला, स्वामींचे दैवी परमशिष्य; विलक्षण अवलिया असलेले शंकर महाराज
15
क्रूरतेची सीमा ओलांडली! श्वास थांबेपर्यंत चिमुकल्याचा गळा दाबला; मृतदेह घाटावर फेकला! मन सुन्न करणारी घटना!
16
सोने-चांदीचे दर कोसळले! विक्रमी उच्चांकावरून सोने १३,०००, तर चांदी २९,००० रुपयांपर्यंत स्वस्त
17
१३८ दिवसांनी शनि मार्गी: ७ राशींची चंगळ, वरदानाचा काळ; यश-पैसा, सुख लाभेल, साडेसाती संपेल?
18
एक नंबर! वडील IAS, लेक झाली अरुणाचल प्रदेशची पहिली महिला IPS; रचला इतिहास
19
सौरभ चौघुलेपासून विभक्त झाल्याच्या चर्चांवर अखेर योगिता चव्हाणनं सोडलं मौन, म्हणाली...
20
रश्मिका मंदानाला व्हायचंय आई, आतापासूनच पडली प्रेमात; म्हणाली, "ठराविक वयात..."

बिहारमध्ये जन्माष्टमी, रामनवमीच्या सुट्ट्या रद्द, तर मुस्लिम बहुल भागात शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:46 IST

Bihar News: बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. याआधी देशामध्ये कुठेही झाला नाही, असा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे.

बिहार सरकारच्या शिक्षण विभागाने सार्वजनिक आणि साप्ताहिक सुट्ट्यांबाबत घेतलेल्या निर्णयामुळे वादाला तोंड फुटले आहे. याआधी देशामध्ये कुठेही झाला नाही, असा निर्णय सरकारने का घेतला असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यात  भाजपाने या निर्णयाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, नितीश कुमार यांनी बिहारला इस्लामिक स्टेट घोषित करण्याची घोषणाही या निर्णयांसोबतच करून टाकावी, असा टोला भाजपाने लगावला आहे. 

हे संपूर्ण प्रकरण बिहार सरकारच्या सुट्ट्यांशी संबंझित आहे. बिहार सरकारने शुक्रवारी साप्ताहित सुट्टी घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच बिहारमध्ये जे प्रदेश मुस्लिम बहूल आहेत, म्हणजेच मुस्लिम बहुसंख्य असतील तिथे आता शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी असेल. मुस्लिमांसाठी शुक्रवारी सुट्टी जाहीर करणारं बिहार हे देशातील पहिलं राज्य आहे. 

या निर्णयामध्ये स्पष्ट आदेश देण्यात आले की, हा आदेश केवळ उर्दू शाळांसाठी नाही तर मुस्लिम बहूल भागातील कुठल्याही सरकारी शाळांनाही लागू राहिली. तिथे आता रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी दिली जाईल. याबाबत शिक्षण विभागाकडून अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी त्या जिल्ह्याच्या डीएमची परवानगी आवश्यक असेल. त्यांनी तशी परवानगी दिली की, शाळांमध्ये रविवारऐवजी शुक्रवारी सुट्टी जाहीर केली जाईल.

एवढंच नाही तर शिक्षण विभागाने २०२४ साठी सरकारी शाळांच्या सुट्टीची यादीही प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये शिक्षण विभागाने २०२४ मध्ये ईद आणि बकरी ईदच्या सुट्टीमध्ये वाढ केली आहे. आता ईद आणि बकरी ईदला दोन ऐवजी तीन दिवस सुट्टी असेल. त्याशिवाय मोहरमला दोन दिवस, शब-ए-बारात या दिवशीही एक एक दिवसाची सुट्टी असेल. मात्र या सुट्ट्या देताना बिहार सरकारने जन्माष्टमी, रामनवमी, महाशिवरात्री, रक्षाबंधन, तीन, जीतिया, यांसारख्या उत्सवांदिवशी दिली जाणारी सुट्टी रद्द करण्यात आली आहे. 

या निर्णयाविरोधात भाजपाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा आमदार हरी भूषण ठाकूर म्हणाले की, आम्ही आधीपासूनच सांगतोय की, नितीश सरकार बिहारमध्ये गझवा ए हिंद कायदा आणू इच्छित आहे. आता या निर्णयामुळे आमचा आरोप आणि संशय खरा होता, हे सिद्ध झाले आहे.  आता नितीश कुमार यांनी बिहारला इस्लामिक स्टेटसुद्धा घोषित केलं पाहिजे. 

दरम्यान, या प्रकरणी बिहार सरकारचे वरिष्ठ मंत्री अशोच चौधरी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, हा निर्णय प्रधान सचिव आणि मंत्र्यांनी पाहिला नसेल. हा जनभावनांशी संबंधित विषय आहे. बऱ्याच वर्षांपासून सुट्ट्या देण्यात येत आहेत. आता सुट्ट्या रद्द केल्या तर जनभावना दुखावल्या जाऊ शकतात. सुट्ट्या रद्द करण्याचं कुठलंही औचित्य नाही आहे. कुणाच्या भावना दुखावणे योग्य नाही. या विषयी चिंता करण्याची गरज नाही. मुख्यमंत्र्यांना जसे याबाबत समजेत, तसे ते या प्रकरणात हस्तक्षेप करतील. हा निर्णय खाली बाबू स्तरावर घेतला गेला असावा, असं वाटतं, अशी सारवासारव त्यांनी केली.  

टॅग्स :BiharबिहारEducationशिक्षणNitish Kumarनितीश कुमारPoliticsराजकारण