उपमहापौर दरमहिन्याला घेणार जनता दरबार
By Admin | Updated: March 11, 2016 22:24 IST2016-03-11T22:24:38+5:302016-03-11T22:24:38+5:30
जळगाव: नागरिकांच्या समस्या, तक्रारी दूर करण्यासाठी दर महिन्याच्या १० तारखेला मनपाच्या सभागृहात जनता दरबार घेण्याचे नियोजन उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले असल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली.

उपमहापौर दरमहिन्याला घेणार जनता दरबार
ज गाव: नागरिकांच्या समस्या, तक्रारी दूर करण्यासाठी दर महिन्याच्या १० तारखेला मनपाच्या सभागृहात जनता दरबार घेण्याचे नियोजन उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले असल्याची माहिती नगरसेवक अनंत जोशी यांनी दिली. दर महिन्याच्या २०-२२ तारखेला महासभा होते. तत्पूर्वी जनता दरबार घेऊन त्यात नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन त्या मार्गी लावण्याच्या सूचना अधिकार्यांना केल्या जातील. महासभेत त्याबाबत पाठपुरावा केला जाईल. इन्फो-हेल्पलाईन सुरू करणारतसेच नागरिकांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदवून घेण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एक दूरध्वनी क्रमांक जाहीर केला जाईल. त्यावर कार्यालयीन वेळेत एक कर्मचारी नागरिकांच्या तक्रारी नोंदवून घेईल. त्यावर अधिकार्यांना तत्काळ कार्यवाहीचे आदेश दिले जातील. प्रत्येक तक्रारीच्या निपटार्यासाठी स्वरूप पाहून कालमर्यादा ठरवून दिली जाईल. मात्र रस्ते व गटारींच्या कामाबाबतची तक्रार त्यात स्विकारण्यात येणार नाही. कारण ही कामे निधीच्या उपलब्धतेनुसार केली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.