जनार्दन द्विवेदींना मोदींची स्तुती भोवणार! तीव्र निषेध : काँग्रेसकडून कारवाईचे संकेत

By Admin | Updated: January 23, 2015 01:05 IST2015-01-23T01:05:49+5:302015-01-23T01:05:49+5:30

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याबद्दल सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. ६९ वर्षीय द्विवेदी यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली असली तरी यावेळी मोदींची स्तुती त्यांना भोवणार असेच दिसते.

Janardhan Dwivedi will praise Modi! Fierce protests: Indicative action by Congress | जनार्दन द्विवेदींना मोदींची स्तुती भोवणार! तीव्र निषेध : काँग्रेसकडून कारवाईचे संकेत

जनार्दन द्विवेदींना मोदींची स्तुती भोवणार! तीव्र निषेध : काँग्रेसकडून कारवाईचे संकेत

ी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केल्याबद्दल सर्वात ज्येष्ठ सरचिटणीस जनार्दन द्विवेदी यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे संकेत काँग्रेसने दिले आहेत. ६९ वर्षीय द्विवेदी यांनी यापूर्वीही वादग्रस्त विधाने केली असली तरी यावेळी मोदींची स्तुती त्यांना भोवणार असेच दिसते.
मी मोदींची प्रशंसा केलेली नसून माझ्या विधानाचा विपर्यास केला असल्याचे सांगत द्विवेदींनी सारवासारव चालविली असतानाच काँग्रेसचे अन्य सरचिटणीस अजय माकन यांनी पत्रपरिषद घेत द्विवेदींना जाहीररीत्या फटकारले आहे. द्विवेदी म्हणाले ते ,काँग्रेसच्या भारतीयत्वाच्या विचारसरणीशी पूर्णपणे विसंगत आहे. मोदींचा विजय हा भारतीयत्वाचा विजय ठरवता येत नाही. पक्ष द्विवेदी यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करीत असल्याचे माकन यांनी स्पष्ट केले. माकन हे सध्या काँग्रेसच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख आहेत. द्विवेदी हे यापूर्वी अ.भा. काँग्रेस समितीच्या प्रसिद्धी विभागाचे प्रमुख राहिले आहेत.
-----------------
मोदी भारतीयत्वाचे
प्रतीक ठरत नाहीत !
मोदींची सात महिन्यांची पंतप्रधानपदाची राजवट असो की ते गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये २०० २ साली उफाळलेल्या जातीय दंगली असोत, कुणालाही मोदींमध्ये भारतीयत्वाचे प्रतीक दिसणार नाही, असे माकन यांनी स्पष्ट केले. गेल्या सात महिन्यांमध्ये दिल्लीत राष्ट्रपती राजवट असून मोदी हेच सरकार चालवत आहेत. या काळात त्रिलोकपुरी आणि बवाना भागात हिंसाचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशा नेतृत्वात भारतीयत्वाचे प्रतीक कसे बघता येणार? मोदींच्या सरकारमधील मंत्री आक्षेपार्ह भाषा बोलत असतानाही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही हे कशाचे निदर्शक आहे, असा सवालही माकन यांनी केला.

Web Title: Janardhan Dwivedi will praise Modi! Fierce protests: Indicative action by Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.