शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus News: एक गाव असं की जिथं जवळपास सर्व गावकरी कोरोना पॉझिटिव्ह! प्रशासनाला खडबडून जाग, सर्वांची धावपळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2022 17:11 IST

Corona Virus News: झारखंडच्या पूर्व सिंहभूमच्या शहरी परिसरानंतर आता ग्रामीण परिसरातही कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळतो आहे.  जिल्ह्याच्या सर्वच भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

Corona Virus News: झारखंडच्या पूर्व सिंहभूमच्या शहरी परिसरानंतर आता ग्रामीण परिसरातही कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळतो आहे.  जिल्ह्याच्या सर्वच भागात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भाग कोरोनामुक्त झाला होता. पण आता पुन्हा एकदा कोरोना संसर्ग वाढत आहे. त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. ग्रामीण भागात घाटशिला, मुसाबनी आणि चाकुलिया विभागात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. 

मंगळवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ११६० नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासन देखील सतर्क झालं आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी शहरी भागात कोरोना चाचणीसाठी एकूण सहा सेंटर सुरु करण्यात आले आहेत. यात साकची जेल चौक येथील कोविड कलेक्शन सेंटर, सोनारी सेवा सदर, एमई स्कूल जुगसलाई, सिदगोडा टाऊन हॉल, शहरी उप-स्वास्थ्य केंद्र मानगो आणि बिरसानगर झोन नंबर-१ बी येथील रायकीय प्रायमरी स्कूल यांचा समावेश आहे. या सेंटरवर सकाळी साडेदहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत कोरोना चाचणीसाठीचं सॅम्पल घेण्यात येत आहे. 

लक्षणं दिसल्यास करा चाचणीपूर्व सिंहभूम जिल्ह्याचे डीसी सूरज कुमार यांनी ट्विट करत सर्व चाचणी केंद्रांची माहिती दिली आहे. तसंच सर्दी, खोकला, अंगदुखी, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणं दिसून येत असतील तातडीनं नजिकच्या चाचणी केंद्रात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी असं आवाहन देखील केलं आहे. तसंच मास्क व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन केलं आहे. 

कोणकोणत्या विभागात किती रुग्ण?बहरागोडा- १३चाकुलिया- ६२धालभूमगड- ७डुमरिया- १घाटशिला- १४७शहरी क्षेत्र- ४३९९मुसाबनी- ४४पटमदा- ७पोटका- १६

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJharkhandझारखंड