जम्मू काश्मीरात पुन्हा दहशतवाद्यांची घुसखोरी, 2 दहशतवाद्यांचा खात्मा
By Admin | Updated: July 30, 2016 15:58 IST2016-07-30T15:58:53+5:302016-07-30T15:58:53+5:30
कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणा-या 2 दहशतवाद्यांचा जवानांनी खात्मा केला आहे

जम्मू काश्मीरात पुन्हा दहशतवाद्यांची घुसखोरी, 2 दहशतवाद्यांचा खात्मा
>ऑनलाइन लोकमत -
श्रीनगर, दि. 30 - कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा घुसखोरीचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला असता भारतीय जवानांनी त्यांचा कट उधळला. भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना रोखत 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. घुसखोरी करण्याचा हा दुसरा प्रयत्न दहशतवाद्यांकडून करण्यात आला. गेल्याच आठवड्यात नौगाम सेक्टरमध्ये भारतीय जवानांनी 4 दहशतवाद्यांचा खात्मा केला होता, तर एका दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं.
नौगाम सेक्टरमधील सीमारेषेवर गस्त घालत असताना जवानांनी काही दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं दिसलं. जवानांनी त्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितलं असता त्यांनी गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. जवानांनी प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून एक जवान जखमी झाला आहे. दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे, असं माहिती वरिष्ठ अधिका-याने दिली आहे.