Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 08:37 AM2019-02-01T08:37:19+5:302019-02-01T08:43:20+5:30

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

Jammu Kashmir: Two terrorists killed in encounter with security forces in Rajpora area of Pulwama | Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Next
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी सकाळी चकमक सुरू झाली.चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील राजपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (1 फेब्रुवारी) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. खात्मा करण्यात आलेले हे दहशतवादी 'जैश-ए-मोहम्मद' संघटनेतील असल्याची माहिती समोर आली आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.  

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. पुलवामामध्ये काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. 


जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये गुरुवारी (31 जानेवारी) पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेड हल्ल्यात दोन सीआरपीएफ जवानांसह पाच जण जखमी झाले होते. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान,गेल्या 5 दिवसांत काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी 20 हून अधिक वेळा ग्रेनेड हल्ले केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रेनेड हल्ला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी केला आहे. यापूर्वी झालेल्या हल्ल्याची जबाबदारीही जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेने घेतली होती.




Web Title: Jammu Kashmir: Two terrorists killed in encounter with security forces in Rajpora area of Pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.