शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, CRPF जवान शहीद तर अनेकजण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 19:32 IST

Jammu-Kashmir: श्रीनगरच्या लाल चौकात दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला, ज्यात एक जवान शहीद झाला तर इतर काही जखमी झाले.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमध्ये काही तासांच्या अंतरातच दोन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पहिल्या हल्ल्यात एका जवानाचा मृत्यू झाला तर काहीजण जखमी झाले. दुसऱ्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी गैर काश्मिरींवर गोळीबार केला. यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला हल्ला श्रीनगरच्या लाल चौकातील मैसुमा भागात झाला. तिथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या दोन जवानांना गोळ्या घातल्या. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले, त्यापैकी एका जवानाला प्राण गमवावे लागले. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे दोन जवानही जखमी झाले आहेत. यानंतर परिसरात दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवली जात आहे. 

दुसरा हल्ला पुलवामाच्या लाजुराह गावात झाला. तिथे दहशतवाद्यांनी दोन गैर-काश्मीरींवर गोळीबार केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरात नाकाबंदी केली असून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. 

मोठा शस्त्रसाठा जप्ततिकडे, सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ एका गावात लपून बसलेल्या एका दहशतवाद्याचा पर्दाफाश केला आणि शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त केला. हवेली तहसीलच्या नूरकोट गावात लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त शोध मोहिमेदरम्यान हा ठावठिकाणा सापडला. जप्त केलेल्या शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्यामध्ये दोन मॅगझिनसह दोन एके-47 रायफल आणि 63 राउंड, 223 बोअरची एके आकाराची बंदूक, दोन मॅगझिन आणि 20 राउंड आणि एक चिनी पिस्तूल यांचा समावेश आहे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्ला