शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षिकेची निर्घृण हत्या, शाळेत घुसून झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 11:36 IST

Jammu-Kashmir: कुलगामच्या गोपालपुरामध्ये काश्मिरी पंडित महिलेची हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी एका स्थानिक टीव्ही अभिनेत्रीचा गोळ्या झाडून खून केला होता.

Jammu-Kashmir Terrorist Attack:जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवरील हल्ले वाढत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक काश्मीरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या. यातच आता आज कुलगाममध्ये एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. शाळेत घुसून महिलेवर गोळीबार करण्यात आला, उपचारादरम्यान महिलेची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घेराबंद करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षा दलाकडून मोठ्या प्रमाणात तपास मोहिम राबवली जात आहे. काश्मीर पोलिसांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या गोपालपुरा परिसरातील एका शाळेत घुसून दहशतवाद्यांनी रजनीबाल नावाच्या महिलेवर गोळीबार केला. 

अभिनेत्रीची हत्यायापूर्वी स्थानिक टीव्ही अभिनेत्री अमरिना यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्ल्यात त्यांचा 10 वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता. या घटनेच्या 24 तासांत हत्येमध्ये सामील दहशतवादी चकमकीत मारला गेला होता. त्याआधी काश्मिरी पंडित राहुल भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सरकारविरोधात निदर्शने झाली. लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे दाद मागितली होती आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जम्मूला बदली करण्याची मागणी केली होती.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला