Jammu-Kashmir: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षिकेची निर्घृण हत्या, शाळेत घुसून झाडल्या गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:34 AM2022-05-31T11:34:30+5:302022-05-31T11:36:57+5:30

Jammu-Kashmir: कुलगामच्या गोपालपुरामध्ये काश्मिरी पंडित महिलेची हत्या करण्यात आली आहे. यापूर्वी दहशतवाद्यांनी एका स्थानिक टीव्ही अभिनेत्रीचा गोळ्या झाडून खून केला होता.

Jammu-Kashmir: Terrorist brutally kills teacher in Kulgam, fired bullets in school | Jammu-Kashmir: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षिकेची निर्घृण हत्या, शाळेत घुसून झाडल्या गोळ्या

Jammu-Kashmir: कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून शिक्षिकेची निर्घृण हत्या, शाळेत घुसून झाडल्या गोळ्या

Next

Jammu-Kashmir Terrorist Attack:जम्मू-काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवरील हल्ले वाढत आहेत. गेल्या काही दिवसात अनेक काश्मीरी पंडितांच्या हत्या करण्यात आल्या. यातच आता आज कुलगाममध्ये एका हिंदू महिला शिक्षिकेची गोळी मारुन हत्या करण्यात आली आहे. शाळेत घुसून महिलेवर गोळीबार करण्यात आला, उपचारादरम्यान महिलेची प्राणज्योत मालवली.

या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घेराबंद करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षा दलाकडून मोठ्या प्रमाणात तपास मोहिम राबवली जात आहे. काश्मीर पोलिसांनी ट्विटरवरुन दिलेल्या माहितीनुसार, कुलगामच्या गोपालपुरा परिसरातील एका शाळेत घुसून दहशतवाद्यांनी रजनीबाल नावाच्या महिलेवर गोळीबार केला. 

अभिनेत्रीची हत्या
यापूर्वी स्थानिक टीव्ही अभिनेत्री अमरिना यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. हल्ल्यात त्यांचा 10 वर्षांचा पुतण्या गंभीर जखमी झाला होता. या घटनेच्या 24 तासांत हत्येमध्ये सामील दहशतवादी चकमकीत मारला गेला होता. त्याआधी काश्मिरी पंडित राहुल भट यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण जम्मू-काश्मीरमध्ये सरकारविरोधात निदर्शने झाली. लोकांनी त्यांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे दाद मागितली होती आणि सरकारी कर्मचाऱ्यांची जम्मूला बदली करण्याची मागणी केली होती.

Web Title: Jammu-Kashmir: Terrorist brutally kills teacher in Kulgam, fired bullets in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.