शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Jammu-Kashmir : शोपियानमध्ये जवानांनी 3 दहशतवाद्यांना घेरलं, चकमक सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 09:08 IST

Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी (3 डिसेंबर) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

ठळक मुद्देशोपियानमध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकसनग्रान गावात लपलेत दहशतवादीदहशतवाद्यांच्या गोळीबाराला जवानांचं चोख प्रत्युत्तर

श्रीनगर - जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी (3 डिसेंबर) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. शोपियान जिल्ह्यातील सनग्रान परिसरात एक घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती समोर आली आहे. जवानांनी परिसराला घेराव घातला आहे. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि एसओजी यांची दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनग्रानमध्ये एका घरात दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोध मोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. 

(Jammu-Kashmir :जवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केलं ठार, शस्त्रास्त्रही केली जप्त)

काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मादक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (24 नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादीम्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवान