शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Jammu Kashmir: राजौरीमध्ये सुरक्षा दलाकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; तर सांबा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी ड्रोनद्वारे पाठवले हत्यार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 15:39 IST

Jammu Kashmir: काल श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात दहशतवाद्यांनी एकानंतर एक असे दोन मोठे स्फोट घडवून आणले.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरच्या राजौरी जवळील थानामंडी परिसरात सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. अजूनही या भागात चकमक सुरुच आहे. दरम्यान, सांबा जिल्ह्यातील राजपुरा सेक्टरमध्ये सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आढळला आहे. यात, 2 पिस्तुल, 5 मॅगझीन, 122 राउंड गोळ्या आणि एक सायलेंसर आढळलेत. हे शस्त्र पाकिस्तानी ड्रोनमधून भारतात आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय.

जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द करण्याला काल दोन वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या डाउनटाउन परिसरात एकानंतर एक असे दोन मोठे स्फोट घडवून आणले. पहिला ब्लास्ट दिवसा डाउनटाउन परिसरात झाला तर दुसरा ब्लास्ट सायंकाळी बेमिना परिसरातील एसएसबी चौकात झाला. यानंतर पोलिस आणि सैन्य अलर्ट झाले असून, ठिकठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

3 महीन्यांपूर्वी ड्रोन हत्यार भारतात आणलेजम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरुच आहेत. दहशतवादी संघटना जम्मू-काश्मीरमध्ये हत्यार पाठवण्यासाठी आता ड्रोनचा वापर करत आहेत. 14 मे रोजी सांबा जिल्ह्यातील सीमेजवळ ड्रोनमधून हत्यार आणण्यात आले होते. त्यात एक AK-47, एक 9एमएम पिस्तुल, एक मॅगझीन आणि 15 काडतुस होते. सुदैवाने हे हत्यार बीएसएफच्या जवानांनी जप्त केले.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादी