शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुलवाम्यात लष्कराने 3 दहशतवाद्यांना केले ठार, 24 तासांत दुसरी चकमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2020 08:31 IST

चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे भारतीय लष्कराच्या जवानांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. 24 तासांत जम्मू-काश्मीरमधील ही दुसरी चकमक आहे. लष्कराच्या म्हणण्यानुसार, दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील जादुरा गावात सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला. काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी एक वाजल्यापासून पोलीस आणि सुरक्षा दल दहशतवाद्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवित आहेत. चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे, त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भारतीय सुरक्षा दलांना पुलवामाच्या जादुरा भागात काही दहशतवादी लपून बसले आहेत आणि कोणता तरी दहशतवादी कट रचण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली होती. माहितीच्या आधारे स्थानिक पोलिसांसह सुरक्षा दलांनी त्या भागाला वेढा घातला. वेढा घालत असताना एका घरात काही दहशतवादी कारवाया करत असल्याचं दिसून आलं. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शस्त्रे खाली ठेवण्यास सांगितले, तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. यानंतर भारतीय सुरक्षा दलांनी गोळीबार केला.आतापर्यंत चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. अजूनही आणखी अतिरेकी त्या भागात लपून बसलेले असू शकतात, म्हणूनच भारतीय सुरक्षा दल अजूनही जागरूक आहेत आणि त्या भागात शोधमोहीम राबवित आहे.यापूर्वी शुक्रवारीही काश्मीरमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 4 दहशतवादी ठार झाले होते आणि एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते. अशा प्रकारे सुरक्षा दलांनी 24 तासांत जम्मू-काश्मीरमध्ये 7 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 

टॅग्स :terroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीर