शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पीडीपी फुटीच्या उंबरठ्यावर; 14 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 15:27 IST

मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणी वाढल्या

श्रीनगर : मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचं भवितव्य सध्या संकटात आहे. भाजपा सत्तेतून बाहेर पडल्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार कोसळलं. तेव्हापासून पक्षाच्या अनेक आमदारांनी त्यांची नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे. पीडीपीचे आमदार अगदी उघडपणे पक्षविरोधी सूर लावत आहेत. पक्ष नेतृत्त्वाकडून घराणेशाही जोपासली जात असल्याचा आरोप आमदारांकडून केला जात आहे. भाजपा गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीर सरकारमधून बाहेर पडला. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. सत्ता गेल्यानंतर आता पीडीपीच्या आमदारांची नाराजी उघडपणे समोर येत आहे. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. पीडीपीचे 14 आमदार पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याचं नाराज नेते आबिद अन्सारी यांनी म्हटलं आहे. शिया नेते इमरान अन्सारी रजा यांनी गेल्याच आठवड्यात पीडीपी सोडत असल्याची घोषणा केली होती. मेहबूबा मुफ्ती यांनी त्यांचा भाऊ तसद्दुक सिद्दीकी यांना पर्यटन मंत्रीपद दिलं होतं. तर मुफ्ती यांचे मामा सरताज मदनी यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप असूनही त्यांना मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आले होते. यामुळे पीडीपीचे अनेक आमदार नाराज आहेत. मुफ्ती यांच्याकडून घराणेशाहीला प्रोत्साहन दिलं जात असल्याची उघड टीका बारामुल्लाचे आमदार जावेद हुसेन यांनी केली आहे. गुलमर्गचे आमदार मोहम्मद वाणी यांनीही भ्रष्टाचार आणि घराणेशाहीच्या मुद्यावरुन पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. त्यामुळे पीडीपीमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला असून पक्षात फूट पडण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीBJPभाजपाBJP-PDPभाजपा-पीडीपी