जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. बेसराणमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिक लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आणि १२ जण जखमी झाले, ज्यात पर्यटक आणि स्थानिकांचा समावेश आहे. अमरनाथ यात्रा सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच हा हल्ला झाला आहे, ज्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय घडलं हे सांगितलं आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात एका महिलेच्या पतीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. सोशल मीडिया आणि स्थानिक बातम्यांमधून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला केवळ मुस्लिम नसल्याचं सांगितल्यामुळे गोळ्या घातल्याचं म्हटलं आहे. महिला आपल्या पतीला वाचवण्यासाठी लोकांना आवाहन करत होती.
प्रत्यक्षदर्शींचे म्हणणं आहे की. ते शेवपुरी खात होते तेव्हा दहशतवादी तिथे आले आणि तुम्ही मुस्लिम आहात का? अशा प्रश्न विचारला. त्यानंतर नाव विचारलं आणि गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि त्यांना योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. शाह यांनी आपत्कालीन बैठक बोलावली आहे.