शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

काश्मीरमध्ये 30 वर्षानंतर सुरू झाले सिनेमा हॉल-मल्टिप्लेक्स, 'या' चित्रपटाने झाली सुरुवात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 14:39 IST

दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे तीन दशकापासून बंद असलेले चित्रपटगृह अखेर सुरू झाले आहेत. INOXने श्रीनगरमध्ये हे मल्टीप्लेक्स तयार केले आहे.

श्रीनगर:जम्मू-काश्मीरमधील सिनेप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आज तीन दशकांनंतर पहिल्यांदाच काश्मीरमध्ये मल्टिप्लेक्स सुरू झाले आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी श्रीनगरमध्ये या मल्टिप्लेक्सचे उद्घाटन केले. उद्घाटनानंतर काश्मीरमधील लोकांना तीन दशकांनंतर प्रथमच मल्टिप्लेक्समध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळाली आहे. 

दरम्यान, काश्मीरसारख्या अतिसंवेदनशील राज्यात मल्टिप्लेक्स सुरू करण्याचा मार्ग तितका सोपा नव्हता. याआधीही काश्‍मीरमध्ये अनेकवेळा सिनेमा हॉल सुरू करण्याचे प्रयत्न झाले, मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत. आता अखेर मल्टिप्लेक्स सुरू झाले आहे. श्रीनगरमध्ये आज उघडलेल्या पहिल्या मल्टिप्लेक्समध्ये आमिर खानचा 'लाल सिंग चड्ढा' चित्रपट दाखवला जात आहे. लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा देखील प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहत आहेत.

प्रत्येक जिल्ह्यात सिनेमा हॉल सुरू होतीलकाश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू करण्याबाबत लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा सांगतात की, आम्ही लवकरच जम्मू-काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात सिनेमा हॉल बनवू. लवकरच अनंतनाग, बांदीपोरा, गंदरबल, डोडा, राजौरी, पूंछ आणि किश्तवाडमध्ये असे सिनेमा हॉल बांधले जातील. सिनेमागृह बांधून सरकारला काही संदेश द्यायचा आहे का? या प्रश्नावर लेफ्टनंट गव्हर्नर म्हणाले, यात कोणताही संदेश नाही. सिनेमा हे एक सशक्त सर्जनशील माध्यम आहे, जे लोकांची संस्कृती आणि मूल्ये प्रतिबिंबित करते. हे जगासाठी ज्ञान, नवनिर्मितीची दारे उघडते आणि लोकांना एकमेकांच्या संस्कृतीची चांगली समज देते.

काश्मीरमध्ये सिनेमा हॉल सुरू करण्यासाठी प्रयत्न1999 मध्ये फारुख अब्दुल्ला सरकारने सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. रिगल, नीलम आणि ब्रॉडवे सिनेमा हॉलमध्येही चित्रपट दाखवण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र रिगल सिनेमाच्या पहिल्या शोदरम्यान दहशतवादी हल्ला झाला. त्या घटनेत एक जण ठार झाला आणि 12 जण जखमी झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटगृहे बंद करण्यात आली. एकट्या श्रीनगरमध्ये दहा सिनेमा हॉल होते, ज्यामध्ये बॉलीवूडचे चित्रपट दाखवले जात होते. काश्मीरमधील अनेक जुनी चित्रपटगृहे नंतर रुग्णालये आणि व्यावसायिक केंद्रांमध्ये बदलली गेली किंवा सुरक्षा दलांसाठी तात्पुरती शिबिरे म्हणून वापरली गेली. 

दहशतवाद्यांच्या भीतीने सिनेमागृहे बंद करण्यात आली 1980 च्या अखेरपर्यंत एकट्या काश्मीर खोऱ्यात डझनभर सिनेमागृहे होती, पण दहशतवादी संघटनांच्या धमक्यांमुळे त्यांचे कामकाज बंद करावे लागले. 1990 च्या दशकात प्रशासनाने ही चित्रपटगृहे पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण सप्टेंबर 1999 मध्ये लाल चौकातील रिगल सिनेमावर झालेल्या प्राणघातक ग्रेनेड हल्ल्यानंतर हे प्रयत्न थांबले. यासोबतच नीलम आणि ब्रॉडवे या दोन चित्रपटगृहांनाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले, त्यामुळे त्यांना व्यवसाय बंद करावा लागला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरcinemaसिनेमा